Corona virus : बकरी ईदच्या दिवशीही पुण्यात नमाजचे होणार 'फेसबुक लाईव्ह' पठण 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2020 04:05 PM2020-07-23T16:05:27+5:302020-07-23T16:07:21+5:30

मशिदीच्या पेश इमाम यांच्या मार्गदर्शनाखाली घरी नमाज पठण करणे नव्या तंत्रज्ञानाच्या वापराने शक्य

Corona virus : Namaj by facebook live on Eid in pune | Corona virus : बकरी ईदच्या दिवशीही पुण्यात नमाजचे होणार 'फेसबुक लाईव्ह' पठण 

Corona virus : बकरी ईदच्या दिवशीही पुण्यात नमाजचे होणार 'फेसबुक लाईव्ह' पठण 

Next

पुणे : कोरोना विषाणू साथीच्या पार्श्वभूमीवर सामूहिक नमाज पठण करू नये, या आवाहनाचे पालन करीत पुण्यातील आझम कॅम्पस मशिदीत शुक्रवार (जुम्मा ) नमाजचे 'फेसबुक लाईव्ह' द्वारे थेट प्रक्षेपण करण्यात येत आहे. बकरी ईदच्या दिवशीही आझम मशिदीद्वारे पुण्यात 'फेसबुक लाईव्ह' पठण करण्यात येणार आहे.  

मशिदीच्या पेश इमाम यांच्या मार्गदर्शनाखाली घरी नमाज पठण करणे नव्या तंत्रज्ञानाच्या वापराने शक्य झाले असून २९ मे पासून हा उपक्रम दर शुक्रवारी सुरु आहे. सलग नवव्या आठवड्यात याही शुक्रवारी हा उपक्रम होत आहे. अशा स्वरूपाचा हा पहिलाच उपक्रम आहे. या तंत्रामुळे मशिदीत गर्दी होत नाही, फक्त पेश इमाम मशिदीतून नमाज पठण करतात आणि इतरांना घरातून त्यात सहभागी होणे शक्य होते. दर शुक्रवारी दुपारी दीड वाजता हा उपक्रम होतो. आझम कॅम्पस शैक्षणिक, सामाजिक परिवाराचे अध्यक्ष डॉ.पी.ए.इनामदार यांनी पत्रकाद्वारे या उपक्रमाची माहिती दिली. आझम कॅम्पस मशिदीमध्ये पेश इमाम असलेले मौलाना नसीम अहमद नमाज पठण करणार आहेत तर  आझम कॅम्पसच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख अमीन शेख यांनी तांत्रिक बाजू सांभाळणार आहेत. 

एरवी शहराच्या विविध भागात मशिदींमध्ये शुक्रवार (जुम्मा) दिवशी सामूहिक नमाज पठण केले जाते. कोरोना संसर्गचा धोका लक्षात घेऊन  शुक्रवारी मशिदीत जाता येत नाही. त्या सर्वांना या फेसबुक लाईव्ह नमाज पठणाचा लाभ होत आहे. आझम कॅम्पस या फेसबुक पेजवर हे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येते. प्रशासनाने दिलेल्या सर्व सूचनांनुसार सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्यात येतात.

Web Title: Corona virus : Namaj by facebook live on Eid in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.