Corona Virus News: पुणे शहरात शनिवारी १ हजार ६३३ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 08:11 PM2021-03-13T20:11:15+5:302021-03-13T20:15:12+5:30

केवळ ६३८ रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी

Corona Virus News: 1 thousand 633 corona infected patients in Pune city on Saturday | Corona Virus News: पुणे शहरात शनिवारी १ हजार ६३३ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ

Corona Virus News: पुणे शहरात शनिवारी १ हजार ६३३ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ

Next
ठळक मुद्देउपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ३५१ जणांची प्रकृती चिंताजनक

पुणे शहरातील कोरोनाबाधित रुग्णवाढीचा वेग कमी होताना दिसत नाहीये. शनिवारी १ हजार ६३३ रुग्णांची वाढ झाली आहे. तर बरे झालेल्या ६३८  रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ३५१ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण १२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या १० हजार ७२३ झाली आहे.   

उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ३५१ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर ७५५ रुग्ण आॅक्सिजनवर आहेत. दिवसभरात १२ मृतांची नोंद करण्यात आली आहे. त्यामध्ये १ रुग्ण पुण्याबाहेरील आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ४ हजार ९३७ झाली आहे. दिवसभरात एकूण ६३८ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या २ लाख ८०३ झाली आहे. तर एकूण रुग्णसंख्या २ लाख १६ हजार ४६३ आणि सक्रिय रूग्णांची संख्या १० हजार ७२३  झाली आहे. दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ९ हजार ७६२  नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत १२ लाख ३९ हजार २६४ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.
 

Web Title: Corona Virus News: 1 thousand 633 corona infected patients in Pune city on Saturday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.