Corona Virus News : पुणे शहरात शनिवारी १११७ रुग्ण झाले बरे; ७०३ नवे कोरोनाबाधित

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2020 12:45 AM2020-10-11T00:45:43+5:302020-10-11T00:45:58+5:30

पुणे शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या १३ हजार ३०० झाली आहे.

Corona Virus News: 1117 patients recovered in Pune on Saturday; 703 New Coronated | Corona Virus News : पुणे शहरात शनिवारी १११७ रुग्ण झाले बरे; ७०३ नवे कोरोनाबाधित

Corona Virus News : पुणे शहरात शनिवारी १११७ रुग्ण झाले बरे; ७०३ नवे कोरोनाबाधित

Next
ठळक मुद्देविविध रुग्णालयातील ७७२ रुग्ण अत्यवस्थ; २२ रुग्णांचा मृत्यू  

पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये शनिवारी दिवसभरात ७०३ रूग्णांची वाढ झाली. तर, दिवसभरात बरे झालेल्या १११७ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ७७२ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण २२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या १३ हजार ३०० झाली आहे.

  उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ७७२ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ४३७ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून ३३५ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. तर, २ हजार ३१८ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. दिवसभरात २२ मृतांची नोंद करण्यात आली आहे. यासोबतच पुण्याबाहेरील २५ रूग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ३ हजार ८०८ झाली आहे. दिवसभरात एकूण १११७ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १ लाख ३६ हजार ४९२ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या १ लाख ५३ हजार ६०० झाली आहे. सक्रिय रूग्णांची संख्या १३ हजार ३०० झाली आहे. 
 -------------  
 दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ४ हजार २३१ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ६ लाख ७३ हजार १६२ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.   

Web Title: Corona Virus News: 1117 patients recovered in Pune on Saturday; 703 New Coronated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.