Corona Virus News : पुणे शहरात १२१ ची नवीन कोरोनाबाधित; १५१ रुग्ण झाले बरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 12:35 PM2021-01-19T12:35:20+5:302021-01-19T13:27:32+5:30

पुणे शहरातील प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या २ हजार ४६२

Corona Virus News : 121 new corona patients and 151 were cured in Pune city | Corona Virus News : पुणे शहरात १२१ ची नवीन कोरोनाबाधित; १५१ रुग्ण झाले बरे

Corona Virus News : पुणे शहरात १२१ ची नवीन कोरोनाबाधित; १५१ रुग्ण झाले बरे

Next
ठळक मुद्देउपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी २०६ जणांची प्रकृती चिंताजनक

पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये सोमवारी दिवसभरात १२१ रूग्णांची वाढ झाली. तर, बरे झालेल्या १५१ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील २०६ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या २ हजार ४६२ झाली आहे.   

उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी २०६ जणांची प्रकृती चिंताजनक  आहे. तर, २९३ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. दिवसभरात ६ मृतांची नोंद करण्यात आली आहे. तर, पुण्याबाहेरील ३ मृत्यूची नोंद करण्यात आली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ४ हजार ७०९ झाली आहे. दिवसभरात एकूण १५१ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १ लाख ७६ हजार १२४ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या १ लाख ८३ हजार २९५ झाली आहे. सक्रिय रूग्णांची संख्या २ हजार ४६२ झाली आहे.   
-------------   
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण २ हजार ४२ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ९ लाख ८३ हजार १६४ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.

Web Title: Corona Virus News : 121 new corona patients and 151 were cured in Pune city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.