Corona Virus News : पुणे शहरात सोमवारी १३५ तर पिंपरीत १२० कोरोनाबाधितांची वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2021 08:15 PM2021-01-04T20:15:37+5:302021-01-04T20:15:43+5:30
पुणे शहरात आजपर्यंत ९ लाख ३२ हजार १६२ जणांची कोरोना तपासणी
पुणे : शहरात सोमवारी १३५ कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, २०२ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात २ हजार ९०१ संशयितांची तपासणी करण्यात आली. तपासणीच्या तुलनेत आजच्या पॉझिटिव्हची टक्केवारी ही ४.६५ टक्के इतकी आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी साडेपाचपर्यंत शहरातील विविध रूग्णांलयांमध्ये २०२ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू असून, आॅक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या ५५५ इतकी आहे.
शहरातील सक्रिय रूग्ण संख्या २ हजार ८३७ इतकी आहेत. आज दिवसभरात ८ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी ३ जण पुण्याबाहेरील आहेत़ शहरातील एकूण मृत्यूची संख्या ही ४ हजार ६५२ इतकी झाली आहे.
शहरात आजपर्यंत ९ लाख ३२ हजार १६२ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी १ लाख ७९ हजार ७३३ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी १ लाख ७२ हजार २४४ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
=========
दिलासादायक : आणखी एक रुग्ण ब्रिटनमधील कोरोनाने बाधित नाही
पिंपरी : ब्रिटनमध्ये नवीन कोरोनाने धुमाकुळ घातला असताना पिंपरी-चिंचवड शहरात आलेल्या सात प्रवाशांचे अहवाल पॉझिट्व्हि आले होते. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नवीन कोरोनाचे बाधित आहेत की नाहीत, हे तपासण्यासाठी एआयव्हीकडे घशातील द्रवांचे नमुने पाठविले होते. त्यापैकी दोन दिवसांपूर्वी एकाचा अहवाल निगेटिव्ह आला होता. त्यानंतर आता आणखी एक अशा एकूण दोन जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरात ब्रिटनवरून आलेल्या २६९ जणांचे शोधकार्य सुरू केले आहे. त्यापैकी १८९ जणांची तपासणी केली होती. त्यापैकी ७ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्यांना भोसरीतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर २१ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत.
कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना ब्रिटनमधील नवीन कोरोनाचा बाधा झाली आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी वैद्यकीय विभागाने रुग्णांच्या घशातील द्रवाचे नमुने एनआयव्हीकडे पाठविले होते. त्यानंतर सोमवारी आणखी एकाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील १२० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून ११० जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर कोरोनाने एकाचा बळी घेतला आहे. तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९७ हजार ०३५ वर गेली आहे. तर कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ९३ हजार ६६७ पोहोचली आहे. तर मृतांची संख्या १ हजार ७६२ वर पोहोचली आहे.