Corona Virus News : पुणे शहरात सोमवारी १६३ कोरोनाबाधितांची वाढ ; २५२ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 12:12 PM2020-12-22T12:12:58+5:302020-12-22T12:13:26+5:30
शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ५ हजार ९८ इतकी
पुणे : शहरात सोमवारी १६३ कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, २५२ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत़ आज दिवसभरात १ हजार ८६२ संशयितांची तपासणी करण्यात आली. तपासणीच्या तुलनेत आजच्या पॉझिटिव्हची टक्केवारी ही ८.७५ टक्के इतकी आहे़
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी चारपर्यंत शहरातील विविध रूग्णांलयांमध्ये ३९० गंभीर रूग्णांवर उपचार सुरू असून, यापैकी २२६ जण व्हेंटिलेटरवर आहेत. तर शहरातील ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या एक हजाराच्या आत कायम असून, आजमितीला ही संख्या ८५६ इतकी आहे.
शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ५ हजार ९८ इतकी आहे़ आज दिवसभरात ७ जणांचा मृत्यू झाला असून, यातील ३ जण पुण्याबाहेरील आहे. शहरातील एकूण मृत्यूची संख्या ही ४ हजार ५८१ इतकी झाली आहे.
शहरात आजपर्यंत ८ लाख ८६ हजार ८०६ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी १ लाख ७६ हजार २२८ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी १ लाख ६६ हजार ५४९ जण कोरोनामुक्त झाले आहेत.