Corona Virus News : पुणे शहरात शनिवारी दिवसभरात १७२ नवीन कोरोनाबाधित ;१८१ रुग्ण झाले बरे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2021 07:52 PM2021-01-30T19:52:40+5:302021-01-30T19:52:59+5:30
आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १ लाख ७८ हजार ९७६ झाली आहे.
पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये शनिवारी दिवसभरात १७२ रूग्णांची वाढ झाली. तर, बरे झालेल्या १८१ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील २०२ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या १ हजार ९९५ झाली आहे.
उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी २०२ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर, २८९ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. दिवसभरात ६ मृतांची नोंद करण्यात आली आहे. पुण्याबाहेरील दोन मृत्यूची नोंद झाली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ४ हजार ७५९ झाली आहे. दिवसभरात एकूण १८१ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १ लाख ७८ हजार ९७६ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या १ लाख ८५ हजार ७३० झाली आहे. सक्रिय रूग्णांची संख्या १ हजार ९९५ झाली आहे.
-------------
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ४ हजार १५२ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत १० लाख २ हजार ३८८ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.