Corona Virus News : पुणे शहरात गुरूवारी २२४ कोरोनाबाधितांची वाढ ; १४९ जण झाले बरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2021 07:13 PM2021-01-28T19:13:26+5:302021-01-28T19:14:04+5:30
पुणे शहरात १ लाख ७८ हजार ५९१ जण कोरोनामुक्त
पुणे : शहरात गुरूवारी २२४ कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, १४९ कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात ३ हजार ६३४ संशयितांची तपासणी करण्यात आली. तुलनेत आजच्या पॉझिटिव्हची टक्केवारी ही ६.१४ टक्के इतकी आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी चारपर्यंत शहरातील विविध रूग्णांलयांमध्ये २०६ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू असून, ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या २९३ इतकी आहे. आज दिवसभरात ५ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी १ जण पुण्याबाहेरील आहेत़ शहरातील एकूण मृत्यूची संख्या ही ४ हजार ७४८ इतकी झाली आहे. शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ही आजमितीला २ हजार १८ इतकी आहे.
शहरात आजपर्यंत १० लाख १५ हजार ३४१ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी १ लाख ८५ हजार ३५७ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी १ लाख ७८ हजार ५९१ जण कोरोनामुक्त झाले आहेत.