Corona virus News : पुणे शहरात गुरूवारी २२८ कोरोनाबाधितांची वाढ ; ३२८ जण कोरोनामुक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2021 08:18 PM2021-02-04T20:18:12+5:302021-02-04T20:18:54+5:30
पुणे शहरात १ लाख ८६ हजार ३१२ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
पुणे : शहरात गुरूवारी २२८ कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, ३२८ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात ३ हजार ८८६ संशयितांची तपासणी करण्यात आली. तपासणीच्या तुलनेत आजच्या पॉझिटिव्हची टक्केवारी ही ५.८६ टक्के इतकी आहे़.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी पाचपर्यंत शहरातील विविध रूग्णांलयांमध्ये १०९ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू असून, ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या २०४ इतकी आहे. आज दिवसभरात ६ जणाचा मृत्यू झाला असून, यापैकी ३ जण पुण्याबाहेरील आहेत. शहरातील एकूण मृत्यूची संख्या ही ४ हजार ७७२ इतकी झाली आहे. शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ही आजमितीला १ हजार ५२३ इतकी आहे.
शहरात आजपर्यंत १० लाख ४१ हजार ६५ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी १ लाख ९२ हजार ६०७ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी १ लाख ८६ हजार ३१२ जण कोरोनामुक्त झाले आहेत.