Corona Virus News: पुणे शहरात गुरूवारी २५६ कोरोनाबाधितांची वाढ; ११३ जण कोरोनामुक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2021 07:23 PM2021-02-11T19:23:46+5:302021-02-11T19:24:28+5:30
शहरात आजपर्यंत १० लाख ६१ हजार ३१८ जणांची कोरोना तपासणी
पुणे : शहरात गुरूवारी २५६ कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, ११३ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात ३ हजार २३० संशयितांची तपासणी करण्यात आली. तपासणीच्या तुलनेत आजच्या पॉझिटिव्हची टक्केवारी ही ७़९ टक्के इतकी आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी चारपर्यंत शहरातील विविध रूग्णांलयांमध्ये १३४ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू असून, ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या २३३ इतकी आहे. आज दिवसभरात एका जणाचा मृत्यू झाला असून, शहरातील एकूण मृत्यूची संख्या ही ४ हजार ७८९ इतकी झाली आहे. शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ही आजमितीला १ हजार ६१७ इतकी आहे.
शहरात आजपर्यंत १० लाख ६१ हजार ३१८ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी १ लाख ९४ हजार ५१ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी १ लाख ८७ हजार ६४५ जण कोरोनामुक्त झाले आहेत.