Corona Virus News :पुणे शहरात शनिवारी ३ हजार ४६३ तर पिंपरीत १ हजार ६९४ नवे कोरोनाबाधित
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2021 10:24 PM2021-03-27T22:24:26+5:302021-03-27T22:24:37+5:30
पुण्यात कोरोना रुग्णवाढ सुरूच....
पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये सलग वाढ सुरुच असून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही वाढत आहे. शनिवारी तब्बल २ हजार ५८४ रुग्ण बरे झाले आहेत. तर, दिवसभरात ३ हजार ४६३ रूग्णांची वाढ झाली. विविध रुग्णालयातील ६२१ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या ३० हजार ८३२ झाली आहे.
उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ६२१ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर, २ हजार २९४ रुग्ण ऑक्सिजनवर असून दिवसभरात ३० मृतांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ५ हजार १९१ झाली आहे. पुण्याबाहेरील ५ मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दिवसभरात एकूण २ हजार ५८४ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या २ लाख १८ हजार ६६३ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या २ लाख ५४ हजार ६८६ झाली आहे. सक्रिय रूग्णांची संख्या ३० हजार ८३२ झाली आहे.
-------------
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण १७ हजार ६३३ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत १४ लाख १७ हजार १९४ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.
......
पिंपरीत १६९४ नवे रुग्ण; दिवसभरात १२४३ जण कोरोनामुक्त
पिंपरी : कोरोनाच्या रुग्णांची संख्या दररोज वाढतच आहे. शहरात शनिवारी दिवसभरात १६९४ जणांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर १२४३ जण कोरोनामुक्त झाले. शहरातील कोरोना पॉझिटव्ह रुग्णांची संख्या एक लाख ३२ हजार २६६ झाली आहे. त्यात महापालिका हद्दीतील एक लाख १४ हजार ८९१ तर महापालिका हद्दीबाहेरील आठ हजार ५३८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
शहरात शनिवारी सहा रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात महापालिका हद्दीतील चार तर शहराबाहेरील दोन रुग्णांचा समावेश आहे. महापालिका हद्दीतील कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या आतापर्यंत १९६१ झाली आहे, तर महापालिका हद्दीबाहेरील ८२९ रुग्ण शहरात उपचारादरम्यान दगावले आहेत. शनिवारी दिवसभरात ६७५० संशयित रुग्ण रुग्णालयात दाखल झाले. तसेच दिवसभरात ४१९२ जणांचे कोरोना तपासणीचे अहवाल निगेटिव्ह आले. १९४९ जणांचे कोरोना चाचणीचे अहवाल प्रलंबित आहेत. रुग्णालयातून ६२९९ जणांना घरी सोडण्यात आले. तर २५४३ रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीबाहेरील ३५५ रुग्ण शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. महापालिका हद्दीतील रहिवासी असलेले कोरोना पॉझिटिव्ह ७४ रुग्ण शहराबाहेरील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. शहरात शनिवारी १५,५१४ सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील २,५४३ रुग्णालयात तर १२,८७१ रुग्ण गृहविलगीकरणात आहेत.