Corona virus news : पुणे शहरात रविवारी ३२२ नवीन कोरोनाबाधितांची वाढ; २२८ जणांची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2020 11:29 AM2020-12-21T11:29:47+5:302020-12-21T11:32:56+5:30
आतापर्यंत ८ लाख ८४ हजार ९४४ रूग्णांची तपासणी..
पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये रविवारी दिवसभरात ३२२ रूग्णांची वाढ झाली. तर, दिवसभरात बरे झालेल्या २२८ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ३८८ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या ५ हजार १९१ झाली आहे.
उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ३८८ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील २२८ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून १५३ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. तर, ८३९ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. दिवसभरात ५ मृतांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ४ हजार ५७७ झाली आहे. पुण्याबाहेरील ३ मृत्यूची नोंद करण्यात आली.
दिवसभरात एकूण २२८ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १ लाख ६६ हजार २९७ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या १ लाख ७६ हजार ६५ झाली आहे. सक्रिय रूग्णांची संख्या ५ हजार १९१ झाली आहे.
-------------
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण २ हजार ८०९ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ८ लाख ८४ हजार ९४४ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.