Corona Virus News: पुणे शहरात शनिवारी ३२८ तर पिंपरीत १६१ नवे कोरोना रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2020 09:19 PM2020-12-19T21:19:57+5:302020-12-19T21:20:47+5:30
पुणे शहरातील आतापर्यंत ८ लाख ८२ हजार १३५ रूग्णांची तपासणी
पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये शनिवारी दिवसभरात ३२८ रूग्णांची वाढ झाली. तर, दिवसभरात बरे झालेल्या २७९ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ३८८ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या ५ हजार १०२ झाली आहे.
उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ३८८ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील २३७ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून १५१ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. तर, ८३० रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. दिवसभरात ८ मृतांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ४ हजार ५७२ झाली आहे. पुण्याबाहेरील ८ मृत्यूची नोंद करण्यात आली.
दिवसभरात एकूण २७९ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १ लाख ६६ हजार ६९ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या १ लाख ७५ हजार ७४३ झाली आहे. सक्रिय रूग्णांची संख्या ५ हजार १०२ झाली आहे.
-------------
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण २ हजार ९२९ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ८ लाख ८२ हजार १३५ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.
....
पिंपरीत दिवसभरात ७७ कोरोनामुक्त : २३२३ जणांना डिस्चार्ज
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात कोरोना विषाणूंचा संसर्ग वाढत आहे. शनिवारी १६१ जणांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९५२३१ झाली. तर दिवसभरात १६१ जण कोरोनामुक्त झाले. २४०७ संशयित रुग्ण रुग्णालयात दाखल झाले. तसेच दिवसभरात १९६७ जणांचे कोरोना तपासणीचे अहवाल निगेटिव्ह आले.
शहरात शनिवारी दिवसभरात महापालिका हद्दीतील एक रुग्ण दगावला. महापालिका हद्दीतील कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या आतापर्यंत १७३४ तर महापालिका हद्दीबाहेरील ७१३ रुग्ण शहरात उपचारादरम्यान दगावले आहेत. शनिवारी दिवसभरात १९१३ जणांचे कोरोना चाचणीचे अहवाल प्रलंबित आहेत. रुग्णालयातून २३२३ जणांना घरी सोडण्यात आले. तर ७५४ रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीबाहेरील १०२ रुग्ण शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. महापालिका हद्दीबाहेरील ७२८२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर महापालिका हद्दीतील ९१७८४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.