Corona virus news : पुणे शहरात बुधवारी ३३८ कोरोनाबाधितांची वाढ ; ३१७ जण कोरोनामुक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2020 08:58 PM2020-12-09T20:58:42+5:302020-12-09T20:59:16+5:30

शहरात आजपर्यंत ८ लाख ४९ हजार ६ जणांची कोरोना तपासणी

Corona virus news : 338 corona infestations increase in Pune on Wednesday; 317 Coronated Coronary Free | Corona virus news : पुणे शहरात बुधवारी ३३८ कोरोनाबाधितांची वाढ ; ३१७ जण कोरोनामुक्त

Corona virus news : पुणे शहरात बुधवारी ३३८ कोरोनाबाधितांची वाढ ; ३१७ जण कोरोनामुक्त

googlenewsNext

 पुणे : शहरात बुधवारी ३३८ कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, ३१७ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात ३ हजार ७०८ संशयितांची तपासणी करण्यात आली. तपासणीच्या तुलनेत पॉझिटिव्हची टक्केवारी आज ९.११ टक्के इतकी आहे. 
    पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी पाचपर्यंत शहरातील विविध रूग्णांलयांमध्ये ४११ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू असून, यापैकी २४५ जण व्हेंटिलेटरवर आहेत.  तर १ हजार १०६ जणांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत. शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ५ हजार ८७  इतकी आहे. आज दिवसभरात ९ जणांचा मृत्यू झाला असून, यातील ५ जण पुण्याबाहेरील आहे. शहरातील एकूण मृत्यूची संख्या ही ४ हजार ५१४ इतकी  झाली आहे. 
    शहरात आजपर्यंत ८ लाख ४९ हजार ६ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी १ लाख ७२ हजार ८९७ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.  यापैकी १ लाख ६३ हजार २९६जण कोरोनामुक्त झाले आहेत. 
    ========================

Web Title: Corona virus news : 338 corona infestations increase in Pune on Wednesday; 317 Coronated Coronary Free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.