Corona virus news : पुणे शहरात शनिवारी दिवसभरात ३५१ तर पिंपरीत १६७ नवे कोरोनाबाधित
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2020 09:11 PM2020-12-05T21:11:17+5:302020-12-05T21:11:50+5:30
पुणे शहरात आतापर्यंत ८ लाख ३७ हजार ४६६ रूग्णांची तपासणी
पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये शनिवारी दिवसभरात ३५१ रूग्णांची वाढ झाली. तर, दिवसभरात बरे झालेल्या ४२३ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ४२५ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या ५ हजार ३०४ झाली आहे.
उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ४२५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील २५० रुग्ण व्हेंटिलेटरवर असून १७५ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. तर, १ हजार १४२ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. दिवसभरात ४ मृतांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ४ हजार ४८६ झाली आहे. पुण्याबाहेरील ६ मृत्यूची नोंद करण्यात आली.
दिवसभरात एकूण ४२३ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १ लाख ६१ हजार ९७९ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या १ लाख ७१ हजार ७६९ झाली आहे. सक्रिय रूग्णांची संख्या ५ हजार ३०४ झाली आहे.
-------------
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ३ हजार ७३६ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ८ लाख ३७ हजार ४६६ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.
......
पिंपरीत नवे १६७ रुग्ण; दिवसभरात ६७ कोरोनामुक्त
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात कोरोना विषाणूंचा संसर्ग वाढत आहे. शनिवारी १६७ जणांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९३,२५५ झाली. तर दिवसभरात ६७ जण कोरोनामुक्त झाले. ३६७८ संशयित रुग्ण रुग्णालयात दाखल झाले. तसेच दिवसभरात ३,१६१ जणांचे कोरोना तपासणीचे अहवाल निगेटिव्ह आले.
शहरात शनिवारी दिवसभरात सहा रुग्ण दगावले. यात महापालिका हद्दीतील चार रुग्णांचा समावेश आहे. महापालिका हद्दीतील कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या आतापर्यंत १६६० तर महापालिका हद्दीबाहेरील ६८२ रुग्ण शहरात उपचारादरम्यान दगावले आहेत. शनिवारी दिवसभरात १३७८ जणांचे कोरोना चाचणीचे अहवाल प्रलंबित आहेत. रुग्णालयातून ३५९४ जणांना घरी सोडण्यात आले. तर ८९९ रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.