Corona Virus News : पुणे शहरात शनिवारी दिवसभरात ४१२ रुग्णांची कोरोनावर मात; २२२ ची वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2020 09:36 PM2020-12-26T21:36:32+5:302020-12-26T21:39:05+5:30
आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १ लाख ६८ हजार ६९२
पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये शनिवारी दिवसभरात २२२ रूग्णांची वाढ झाली. तर, दिवसभरात बरे झालेल्या ४१२ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ३८९ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या ४ हजार २८४ झाली आहे.
उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ३८९ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील २२९ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून १६० रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. तर, ८५० रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. दिवसभरात ७ मृतांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ४ हजार ६०४ झाली आहे. पुण्याबाहेरील ४ मृत्यूची नोंद करण्यात आली.
दिवसभरात एकूण ४१२ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १ लाख ६८ हजार ६९२ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या १ लाख ७७ हजार ५८० झाली आहे. सक्रिय रूग्णांची संख्या ४ हजार २८४ झाली आहे.
-------------
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण २ हजार ८०१ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ९ लाख १ हजार ८०६ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.