Corona Virus News : पुणे शहरात शनिवारी दिवसभरात ४१४ रूग्णांची वाढ; २४७ रुग्ण झाले बरे 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2021 07:12 PM2021-02-20T19:12:50+5:302021-02-20T19:13:24+5:30

प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या २ हजार ५६१ झाली आहे.   

Corona Virus News : 414 more patients in Pune on Saturday; 247 patients were cured | Corona Virus News : पुणे शहरात शनिवारी दिवसभरात ४१४ रूग्णांची वाढ; २४७ रुग्ण झाले बरे 

Corona Virus News : पुणे शहरात शनिवारी दिवसभरात ४१४ रूग्णांची वाढ; २४७ रुग्ण झाले बरे 

Next
ठळक मुद्देदिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ४ हजार ६३४ नागरिकांची स्वाब तपासणी

पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये शनिवारी दिवसभरात ४१४ रूग्णांची वाढ झाली. तर, बरे झालेल्या २४७ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील १६० रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या २ हजार ५६१ झाली आहे.   

उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी १६० जणांची प्रकृती चिंताजनक  आहे. तर, ३४५ रुग्ण आॅक्सिजनवर आहेत. दिवसभरात ५ मृतांची नोंद करण्यात आली आहे. पुण्याबाहेरील एका मृत्यूची नोंद झाली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ४ हजार ८२१ झाली आहे. 

दिवसभरात एकूण २४७ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १ लाख ८९ हजार ९४८ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या १ लाख ९७ हजार ३३० झाली आहे. सक्रिय रूग्णांची संख्या २ हजार ५७१ झाली आहे.   
-------------   
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ४ हजार ६३४ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत १० लाख ९४ हजार ४२७ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.

Web Title: Corona Virus News : 414 more patients in Pune on Saturday; 247 patients were cured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.