Corona Virus News : पुणे शहरात सलग चौथ्या दिवशी कोरोनाबाधितांचा आकडा ७०० च्या पार; पिंपरीत ३७० रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2021 08:00 PM2021-02-27T20:00:41+5:302021-02-27T20:00:49+5:30
पुणे शहरात प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या ४ हजार ८९६ झाली आहे...
पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये सलग चौथ्या दिवशी ७०० च्या पुढे वाढ झाली असून सक्रीय रुग्णांचा आकडाही वाढला आहे. शनिवारी दिवसभरात ७३९ रूग्णांची वाढ झाली. तर, बरे झालेल्या ४१२ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील २६० रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या ४ हजार ८९६ झाली आहे.
उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी २६० जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर, ५०९ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. दिवसभरात ६ मृतांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ४ हजार ८५३ झाली आहे.
दिवसभरात एकूण ४१२ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १ लाख ९२ हजार ५०१ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या २ लाख १ हजार ९२८ झाली आहे. सक्रिय रूग्णांची संख्या ४ हजार ८५३ झाली आहे.
-------------
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ८ हजार ४१ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ११ लाख ३६ हजार ३७३ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.
....
पिंपरीत दिवसभरात नवे ३७० रुग्ण : शहरातील चाैघे दगावले
पिंपरी : कोरोनाच्या रुग्णांची संख्या दररोज वाढतच आहे. शहरात शनिवारपर्यंत एकूण एक लाख पाच हजार २८१ नागरिकांना कोरोना विषाणूंचा संसर्ग झाला. त्यात दिलासादायक बाब म्हणजे त्यातील एक लाख ७३ रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. शनिवारी दिवसभरात ३७० जणांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर ३३० जण कोरोनामुक्त झाले.
शहरात शनिवारी महापालिका हद्दीतील चार रुग्णांचा मृत्यू झाला. महापालिका हद्दीतील कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या आतापर्यंत १८४१ झाली आहे, तर महापालिका हद्दीबाहेरील ७७२ रुग्ण शहरात उपचारादरम्यान दगावले आहेत. शनिवारी दिवसभरात २३२१ संशयित रुग्ण रुग्णालयात दाखल झाले. तसेच दिवसभरात १६४१ जणांचे कोरोना तपासणीचे अहवाल निगेटिव्ह आले. ११८५ जणांचे कोरोना चाचणीचे अहवाल प्रलंबित आहेत. रुग्णालयातून २२८१ जणांना घरी सोडण्यात आले. तर ८३१ रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.