Corona Virus News : पुणे शहरात बुधवारी १२८ कोरोनाबाधितांची वाढ; सक्रिय रूग्णसंख्या दोन हजारच्या आत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2021 09:41 PM2021-01-27T21:41:49+5:302021-01-27T21:42:31+5:30
पुणे शहरात आजपर्यंत १० लाख ११ हजार ७०७ जणांची कोरोना तपासणी
पुणे : शहरात बुधवारी १२८ कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, १६८ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत़ आज दिवसभरात ३ हजार ७१ संशयितांची तपासणी करण्यात आली. तपासणीच्या तुलनेत आजच्या पॉझिटिव्हची टक्केवारी ही ४़१४ टक्के इतकी आहे़ दरम्यान गेल्या दहा महिन्यात १९ हजारापर्यंत पोहचलेली सक्रिय रूग्ण संख्या आजमितीला दोन हजाराच्या आत आली असून, सध्या शहरात कोरोनाचे १ हजार ९४७ इतकेच सक्रिय रूग्ण आहेत.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी चारपर्यंत शहरातील विविध रूग्णांलयांमध्ये २०२ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू असून, ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या २९६ इतकी आहे. आज दिवसभरात ५ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी ३ जण पुण्याबाहेरील आहेत. शहरातील एकूण मृत्यूची संख्या ही ४ हजार ७४४ इतकी झाली आहे.
शहरात आजपर्यंत १० लाख ११ हजार ७०७ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी १ लाख ८५ हजार १३३ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी १ लाख ७८ हजार ४४२ जण कोरोनामुक्त झाले आहेत.