Corona Virus News : पुणे शहरात शनिवारी दिवसभरात २८२ नव्या कोरोनाबाधितांची वाढ : ३४७ रुग्ण झाले बरे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2021 08:20 PM2021-01-09T20:20:56+5:302021-01-09T20:21:07+5:30

सक्रिय रूग्णांची संख्या २ हजार ६४६

Corona Virus News : An increase of 282 new corona patients in Pune city on Saturday: 347 patients recovered | Corona Virus News : पुणे शहरात शनिवारी दिवसभरात २८२ नव्या कोरोनाबाधितांची वाढ : ३४७ रुग्ण झाले बरे

Corona Virus News : पुणे शहरात शनिवारी दिवसभरात २८२ नव्या कोरोनाबाधितांची वाढ : ३४७ रुग्ण झाले बरे

Next
ठळक मुद्देआजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १ लाख ७३ हजार ९२९

पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये शनिवारी दिवसभरात २८२ रूग्णांची वाढ झाली. तर, दिवसभरात बरे झालेल्या ३४७ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील २१० रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या २ हजार ६४६ झाली आहे.   

उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी २१० जणांची प्रकृती चिंताजनक  आहे. तर, ३१० रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. दिवसभरात ४ मृतांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ४ हजार ६७२ झाली आहे. पुण्याबाहेरील १ मृत्यूची नोंद करण्यात आली. दिवसभरात एकूण ३४७ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १ लाख ७३ हजार ९२९ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या १ लाख ८१ हजार २४७ झाली आहे. सक्रिय रूग्णांची संख्या २ हजार ६४६ झाली आहे.   
-------------   
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ४ हजार ४८० नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ९ लाख ५५ हजार ५२ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.

Web Title: Corona Virus News : An increase of 282 new corona patients in Pune city on Saturday: 347 patients recovered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.