Corona Virus News : चिंताजनक! पुणे शहरात शनिवारी कोरोनाबाधितांचा आकडा ३ हजारच्या पार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 07:39 PM2021-03-20T19:39:19+5:302021-03-20T19:46:59+5:30
शहरातील सक्रिय रुग्णसंख्या पोहचली २१ हजारच्या उंबरठ्यावर
पुणे : शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून, शनिवारी कोरोना आपत्तीनंतर प्रथमच एका दिवसात ३ हजार पेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत. आज दिवसभरात तब्बल ३ हजार १११ नवीन रुग्णांची नोंद घेण्यात आली असून, १४ हजार ४८४ जणांची तपासणी करण्यात आली आहे. तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी २१.४७ टक्के इतकी आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज सायंकाळी साडेपाच पर्यंत शहरातील सक्रिय रुग्ण संख्या २० हजार ८८९ इतकी झाली आहे. सध्या विविध रुग्णालयात ५३८ गंभीर रुग्णांवर उपचार सुरू असून, ९२१ रुग्ण ऑक्सिजनसह उपचार घेत आहेत. दिवसभरात २१ जणांचा मृत्यू झाला असून, यातील ५ जण पुण्याबाहेरील आहेत.
शहरात आजपर्यंत १३ लाख १३ हजार ८७० हजार जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी २ लाख ३२ हजार ४९४ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी २ लाख ६ हजार ५७२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. शहरातील एकूण मृत्यूची संख्या ५ हजार ३३ इतकी झाली आहे.
==========================