Corona virus : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यात ३१ गावांमध्ये पर्यटन व वर्षाविहारास 'नो एंट्री'     

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2020 02:40 PM2020-07-06T14:40:15+5:302020-07-06T14:47:14+5:30

मावळ तालुक्यात आंदरमावळ, पवनमावळ, नाणेमावळ या ग्रामीण भागासह लोणावळा, खंडाळा याठिकाणी दरवर्षी लाखो पर्यटक येतात.

Corona virus :'No entry' for tourism and picnics in 31 villages in Maval taluka on the backdrop of Corona | Corona virus : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यात ३१ गावांमध्ये पर्यटन व वर्षाविहारास 'नो एंट्री'     

Corona virus : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यात ३१ गावांमध्ये पर्यटन व वर्षाविहारास 'नो एंट्री'     

googlenewsNext
ठळक मुद्देलोणावळा येथील  टायगर, लायन्स, शिवलींग पॉईंट आदी ठिकाणी वर्षाविहार व पर्यटनास बंदीगेल्या दहा दिवसात पोलिसांनी देखील अनेक खटले केले दाखल

मावळ  :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यात पर्यटन क्षेत्र असलेल्या ३१ गावांमध्ये वर्षाविहार पर्यटनास बंदी--आदेशचा भंग करणां-यावर कडक कारवाई करण्याचे प्रांताधिकारी संदेश शिर्के यांनी पोलिसांना आदेश दिले.

मावळ तालुक्यात आंदरमावळ, पवनमावळ, नाणेमावळ या ग्रामीण भागासह लोणावळा, खंडाळा याठिकाणी दरवर्षी लाखो पर्यटक येतात. पाण्याबुडून मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. अनेकवेळा बंदी आदेश असतानाही पर्यटक जीव धोक्यात घालुन वर्षाविहाराचा आनंद लुटतात. परंतु या वर्षी रोनाच्या पाश्वॅभूमीवर जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील धरण परिसरात पर्यटनास बंदी घातली आहे. तरीदेखील गेल्या आठवड्यात काही पर्यटक नियम धाब्यावर ठेऊन आंदरमावळ, नाणेमावळ तसेच पवनाधरण परिसर , लोणावळा खंडाळा या भागात गर्दी करू लागले आहेत. शनिवारी व रविवारी पर्यटकांनी घुसखोरी करूनये यासाठी पोलिसांनी नाकेबंदी केली आहे. तरीदेखील छुप्या मार्गाने पर्यटक येऊ लागले आहेत. गेल्या दहा दिवसात पोलिसांनी देखील अनेक खटले दाखल केले आहेत.

कडक कारवाईचे आदेश

मावळ तालुक्यातील धरण परिसरासह किल्ले, लेण्या व पर्यटन क्षेत्र असलेल्या ३१ गावांमध्ये बंदी घालण्याचे आदेश प्रांताधिकारी संदेश शिर्के यांनी आदेश काढले असून तहसीलदार मधुसुदन बर्गे  व सर्व पोलिस निरीक्षकांना त्वरीत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. 

................................................

मावळात या ३१ ठिकाणी बंदी.

वडेश्वर, टाकवे बुद्रुक, फळणे, माऊ, नागाथली, वहाणगाव, कुसवली, बोरवली, डाहूली, सावळा, कुसुर, निळशी, खांड, राजमाची, फनसराई, उधेवाडी, पवनाधरण व भुशी धरण परिसर, तुंगार्ली धरण, राजमाची व मंकी पॉईंट खंडाळा, घुबड तलाव व डुक्स नोज कुरवंडे, घोरवडेश्वर डोंगर, एकविरा देवी, कार्ला लेणी, भाजे लेणी, भाजे धबधबा, लोहगड, विसापूर, तुंग तिकोना किल्ले , आंबेगाव धबधबा, दुधीवरे येथील प्रती पंढरपूर ,लोणावळा येथील  टायगर, लायन्स, शिवलींग पॉईंट आदी ठिकाणी वर्षाविहार व पर्यटनास बंदी घातली आहे.

Web Title: Corona virus :'No entry' for tourism and picnics in 31 villages in Maval taluka on the backdrop of Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.