Corona virus : पुणे शहरातील सक्रिय रूग्णसंख्या ५ हजारांच्या आत; शुक्रवारी ३४९ नवे रुग्ण तर ६९९ कोरोनामुक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2021 08:39 PM2021-06-04T20:39:51+5:302021-06-04T20:40:36+5:30

कोरोना आपत्तीच्या दुसऱ्या लाटेत पन्नास हजारांच्या पुढे गेलेली शहरातील कोरोनाबाधितांची सक्रिय रूग्ण संख्या दीड महिन्यानंतर पाच हजाराच्या आत आली...

Corona virus : The number of active patients in Pune city is within 5000; On Friday, 349 new patients and 699 corona-free | Corona virus : पुणे शहरातील सक्रिय रूग्णसंख्या ५ हजारांच्या आत; शुक्रवारी ३४९ नवे रुग्ण तर ६९९ कोरोनामुक्त

Corona virus : पुणे शहरातील सक्रिय रूग्णसंख्या ५ हजारांच्या आत; शुक्रवारी ३४९ नवे रुग्ण तर ६९९ कोरोनामुक्त

Next

पुणे : कोरोना आपत्तीच्या दुसऱ्या लाटेत पन्नास हजारांच्या पुढे गेलेली शहरातील कोरोनाबाधितांची सक्रिय रूग्ण संख्या साधारणत: दीड महिन्यानंतर शुक्रवारी पाच हजाराच्या आत आली आहे. आजमितीला शहरात ४ हजार ८४२ कोरोनाचे सक्रिय रूग्ण असून, यापैकी सुमारे ६० टक्के रूग्ण हे होम आयासोलेशनमध्ये आहेत.

आज दिवसभरात नव्याने ३४९ कोरोनाबाधित आढळून आले असून, ६९९ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात विविध तपासणी केंद्रांवर ७ हजार ८७१ संशयितांची तपासणी करण्यात आली. तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ही ४.४३ टक्के इतकी आहे़ आज ३३ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी १२ जण हे पुण्याबाहेरील असून, शहरातील आजचा मृत्यूदर हा १़७७ टक्के इतका आहे.

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रूग्णालयांमध्ये सध्या १ हजार ३७२ जणांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू असून, शहरातील गंभीर रूग्ण संख्या ही ७२१ इतकी आहे. शहरात आत्तापर्यंत २५ लाख २६ हजार २२१ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ७१ हजार ५७७ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.  तर यापैकी ४ लाख ५८ हजार ३७४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत ८ हजार ३६१ जणांचा मृत्यू झाला आहे.

-----------

Web Title: Corona virus : The number of active patients in Pune city is within 5000; On Friday, 349 new patients and 699 corona-free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.