Corona virus : चिंताजनक! पुणे विभागात एकाच दिवसांत कोरोनाचे उच्चांकी २०३ रूग्ण वाढले ; पाच मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 07:10 PM2020-04-30T19:10:53+5:302020-04-30T20:20:02+5:30

कोरोना बाधित रूग्ण पोहचले १९०५ वर, तर मृतांनी गाठली शंभरी 

Corona virus : The number of corona patients increased BY 203 in a single day and Five deaths In the Pune division | Corona virus : चिंताजनक! पुणे विभागात एकाच दिवसांत कोरोनाचे उच्चांकी २०३ रूग्ण वाढले ; पाच मृत्यू 

Corona virus : चिंताजनक! पुणे विभागात एकाच दिवसांत कोरोनाचे उच्चांकी २०३ रूग्ण वाढले ; पाच मृत्यू 

Next
ठळक मुद्देपुणे विभागातील ३०५ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले

पुणे : पुणे विभागातील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांच्या वाढीचा वेग झपाट्याने वाढतच असून, एकाच दिवसांत विभागामध्ये 203 नवीन रूग्णांची भर पडली आहे. यात सर्वाधिक तब्बल 200 रूग्ण एकट्या पुणे जिल्ह्यात वाढले आहेत. तर दिवसभरात कोरोना बाधित 5 रूग्णांची मृत्यु झाला आहे. यामुळे आता कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 1 हजार 905 वर जाऊन पोहचली आहे. तर मृत्यु 99 वर जाऊन पोहचले आहेत.
पुणे विभागातील 305कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 हजार 905 झाली आहे. तर ?क्टीव रुग्ण 1 हजार 504 आहेत. तर सध्या 77 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
    विभागात 1 हजार 905 बाधित रुग्ण असून 99 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पुणे जिल्हयात 1 हजार 738 बाधित रुग्ण असून 90 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्हयात 43 बाधित रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हयात 81 बाधित रुग्ण असून 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हयात 30 बाधीत रुग्ण असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्हयात 13 बाधित रुग्ण आहेत.
पुणे जिल्हयातील कोरोना बाधित रुग्ण 1 हजार 738 झाले आहेत. तर 268 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. जिल्हयात ?क्टीव रुग्ण 1 हजार 383 असून कोरोनाबाधित 90 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 76 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. 
आजपर्यत विभागामध्ये एकूण 19 हजार 23 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 18 हजार 59 चा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 964 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 16 हजार 212 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह आला असून 1 हजार 905 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
आजपर्यंत विभागातील 62 लाख 89 हजार 701 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 2 कोटी 42 लाख 11 हजार 256 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 1 हजार 414 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.

पुणे विभाग एकूण कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण : 1905
जिल्हा         रूग्ण संख्या     मृत्यू
पुणे              1738                90
सातारा         43                    02 
सोलापूर       81                    06
सांगली         30                   01
कोल्हापूर     13                    00
एकूण         1905                 99

Web Title: Corona virus : The number of corona patients increased BY 203 in a single day and Five deaths In the Pune division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.