Corona virus : पुणे शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ; मंगळवारी ४१६ नवे रुग्ण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2020 11:47 AM2020-11-25T11:47:42+5:302020-11-25T11:55:12+5:30

शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये ४१९ गंभीर रूग्णांवर उपचार सध्या उपचार सुरू

Corona virus : The number of corona positive patients increased again in Pune city on Tuesday; 416 new patients | Corona virus : पुणे शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ; मंगळवारी ४१६ नवे रुग्ण 

Corona virus : पुणे शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ; मंगळवारी ४१६ नवे रुग्ण 

Next
ठळक मुद्दे३ हजार ५३ जणांची तपासणी : २१८ जण कोरोनामुक्त 

पुणे : कोरोना तपासणीच्या एकूण संख्येपैकी कोरोना पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण मंगळवारी पुन्हा १३ टक्क्यांवर गेले असून, आज दिवसभरात ४१६ नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत़  गेल्या तीन दिवसांपासून कमी झालेली कोरोनाबाधितांची वाढ आज पुन्हा चारशेच्यावर गेली आहे.
    पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज सायंकाळी सहापर्यंत करण्यात आलेल्या ३ हजार ५३ संशयितांच्या तपासण्यांमध्ये ४१६ कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे. तर दिवसभरात २१८ जण कोरोनामुक्त झाले आहेत.  शहरातील सक्रिय रूग्ण संख्याही पुन्हा ५ हजाराच्या पुढे गेली असून, आजमितीला शहरात ५ हजार ११० सक्रिय रूग्ण आहेत. 
    शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये ४१९ गंभीर रूग्णांवर उपचार सध्या उपचार सुरू असून, यापैकी २५२ जण व्हेंटिलेटरवर आहेत़  तर १ हजार १०१ रूग्णांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत. आज दिवसभरात ८  जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी ३ जण पुण्याबाहेरील आहेत.  
    पुणे शहरात आत्तापर्यंत ७ लाख ९५ हजार ५७१ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे. यापैकी १ लाख ६७ हजार ६०४ जण पॉझिटिव्ह आले असून, यातील १ लाख ५८ हजार ५४ जण कोरोनामुक्त झाले आहेत.  तर आत्तापर्यंत ४ हजार ४४० जणांचा मृत्यू झाला आहे़.

पिंपरी-चिंचवडमध्ये मंगळवारी १८९ कोरोना रुग्णांची नोंद

पिंपरी-चिंचवडमध्ये मंगळवारी १८९ कोरोना रुग्णांची नोंद झाली तर ७७ जणांनी कोरोनावर मात केली. तसेच दहा जणांचा मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात आजपर्यंत कोरोनारुग्णांची संख्या ९१ हजार ३८ वर झाली असून त्यापैकी ८७ हजार ४६१ जण ठणठणीत बरे झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या ७८१ एवढी आहे

Web Title: Corona virus : The number of corona positive patients increased again in Pune city on Tuesday; 416 new patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.