Corona virus : पुणे जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या २३०० वर ; मृत्यू १२७
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2020 12:07 PM2020-05-07T12:07:15+5:302020-05-07T12:10:45+5:30
पुणे शहरातील रुग्णांनी ओलांडला २ हजारांचा टप्पा
पुणे : पुणे जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या २३००वर जाऊन पोहचली, तर मृत्यु १२७ पर्यंत गेले आहेत. जिल्ह्यात बुधवारी (दि.६) रोजी एकाच दिवसांत ९९नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची वाढ झाली. तर एका दिवसांत 7 कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांचा मृत्यू झाला.दरम्यान आत्तापर्यंत ६६५ कोरोना बाधित रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
जिल्ह्यात बुधवारी ६६७ संशयित रूग्णांची तपासणी करण्यात आली. यापैकी ५५१संशयित रूग्णांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून , केवळ ९९ संशयिताचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तर १७ व्यक्तीचे प्रलंबित आहेत. बुधवारी एका दिवसांत ५७ कोरोना बाधित रूग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. तर सध्या ८८ रूग्णांची प्रकृती गंभीर असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्षष्ट केले आहे.
------
शहरातील रुग्णांनी ओलांडला २ हजारांचा टप्पा
दिवसभरात ८६ रूग्णांची वाढ : एकूण ७९ रुग्ण अत्यवस्थ तर ७ रुग्णांचा मृत्यू
पुणे शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा दोन हजारांच्या पार गेला असून सोमवारी दिवसभरात ८६ रूग्णांची भर पडली. शहरात एकूण रूग्णांची संख्या २ हजार २९ झाली आहे. दिवसभरात एकूण सात रुग्णांचा मृत्यू झाला असून कोरोनावर मात करीत पूर्णपणे बरे झालेल्या ५२ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेले एकूण ७९ रुग्ण अत्यवस्थ असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
बुधवारी रात्री साडे आठपर्यंत शहरात नव्याने नोंद करण्यात आलेल्या ८६ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ससून रूग्णालयात ०६, नायडू रुग्णालयात ५२ तर खासगी रुग्णालयांमध्ये २८ रुग्ण दाखल झाले आहेत. शहरातील उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ७९ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील १८ जण व्हेंटिलेटरवर असून ६१ जण आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत.
शहरात सोमवारी सात मृतांची नोंद करण्यात आली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ११८ झाली आहे. एकूण ५२ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ५८७ झाली आहे.
-------------
एकूण बाधित रूग्ण : २३००
पुणे शहर :२०२६
पिंपरी चिंचवड : १४८
कॅन्टोनमेन्ट व ग्रामीण : १२६
मृत्यु : १२७
घरी सोडलेले : ६६५