Corona virus : पुणे विभागात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या साडे तीन हजारांवरून 1986 पर्यंत कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 08:06 PM2020-05-12T20:06:01+5:302020-05-12T20:14:23+5:30
पुणे विभागात मंगळवारी नव्याने 167 ने वाढ, तर 12 रूग्णांचा मृत्यू
पुणे : पुणे विभागात गेल्या दोन महिन्यात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 3 हजार 532 वरून 1 हजार 986 पर्यंत कमी झाला आहे. कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना रूग्ण बरे होऊन घरी जाणाऱ्या रूग्णांचे प्रमाण देखील दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळेच आता पर्यंत 1 हजार 237 रूग्ण बरे होऊन आपल्या घरी देखील परतले आहेत. दरम्यान मंगळवार (दि.12) रोजी एका दिवसांत 167 नवीन रूग्णांची भर पडली असून, तर 12 रूग्णांचा मृत्यू झाला. दरम्यान हॉस्पिटलमध्ये असलेल्या 128 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्हयातील 3 हजार 80 बाधीत रुग्ण असून 1 हजार 240 कोरोना बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अॅक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 675 आहे. कोरोनाबाधित एकूण 165 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 119 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. सातारा जिल्हयातील 121 कोरोना बाधीत रुग्ण असून 35 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अॅक्टीव रुग्ण संख्या 84 आहे. कोरोनाबाधित एकूण 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हयातील 275 कोरोना बाधीत रुग्ण असून 47 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अॅक्टीव रुग्ण संख्या 210 आहे. कोरोनाबाधित एकूण 18 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हयातील 38 कोरोना बाधीत रुग्ण असून 28 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ?क्टीव रुग्ण संख्या 9 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हयातील 18 कोरोना बाधीत रुग्ण असून 9 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अॅक्टीव रुग्ण संख्या 8 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 36 हजार 218 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 33 हजार 591 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 2 हजार 626 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 30 हजार नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 3 हजार 532 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
आजपर्यंत विभागामधील 96 लाख 11 हजार 214 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 4 कोटी 15 लाख 86 हजार 99 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 2 हजार 327 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.
-----