Corona virus : खेड तालुक्यात आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन करण्याची मागणी, कोरोनाबाधितांची संख्या १४५ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 06:19 PM2020-07-02T18:19:51+5:302020-07-02T18:28:17+5:30

गेल्या आठ दिवसात रुग्णवाढीचा वेग दुप्पट

Corona virus : Number of corona victims in Khed taluka at 145; Demand for eight days of strict lockdown | Corona virus : खेड तालुक्यात आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन करण्याची मागणी, कोरोनाबाधितांची संख्या १४५ वर

Corona virus : खेड तालुक्यात आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन करण्याची मागणी, कोरोनाबाधितांची संख्या १४५ वर

Next
ठळक मुद्देखेड तालुक्यात राजगुरुनगर, आळंदी, चाकण या नगर परिषदेचा समावेशनागरिकांमध्ये भीतीचे व असुरक्षित वातावरण निर्माण

राजगुरुनगर: खेड तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. मागील तीन दिवसांत ४० नवीन रुग्ण आढळले असून एकूण रुग्णसंख्या १४५ वर पोहचली आहे. त्यामुळे खेड तालुक्यात पुन्हा एकदा आठ दिवसाकरता लॉकडाऊन करावा. अशी मागणी पंचायत समिती सभापती अंकुश राक्षे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. 

खेड तालुक्यात १५ मे रोजी राक्षेवाडी येथे कोरोना पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळला होता. तो रुग्ण पुणे येथे ये -जा करत होता..त्यानंतर पंचवीस जून पर्यंत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या सत्तावन्न होती. मात्र गेल्या आठ दिवसात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे तालुक्यात भीतीचे व असुरक्षित वातावरण निर्माण झाले आहे. खेड तालुक्यात राजगुरुनगर, आळंदी, चाकण या नगर परिषदेचा समावेश होतो. तसेच चाकण व म्हाळुंगे या परिसरात मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्षेत्र असल्यामुळे पुणे व पिंपरी चिंचवड येथुन येणारी कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मेदनकरवाडी, कडाचीवाडी, खराबवाडी, या परिसरात मोठ्या संख्येने कामगार व स्थानिक नागरिक राहत आहे. तालुक्यात प्रथमत: आढळणारे रुग्ण हे पुणे व पिंपरी शहरातून आल्याचे लक्षात आले आहे.

गेल्या आठ दिवसात कोरोना पॉझिटिव्ह रुणांची संख्या १४५ पर्यत वाढली आहे. येथील स्थानिक नागरिकांना पुणे येथून रेड झोन मधून येणाऱ्या व्यक्तीच्या संपर्कात येत असल्याने कोरोना बाधित होत असल्याचे निर्देशनास येत आहे. ही अतिशय गंभीर बाब असून याबाबत तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य व प्रशासनाने चिंता व्यक्त केली आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून खेड तालुका आठ दिवसाकरता लॉक डाऊन करावा, अशी मागणी होत आहे. खेड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याच्या व हिताच्या दृष्टीने अत्यावश्यक सेवा वगळता खेड तालुका आठ दिवस लॉकडाऊन करावा अशी मागणी सभापती अंकुश राक्षे यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे केली आहे

Web Title: Corona virus : Number of corona victims in Khed taluka at 145; Demand for eight days of strict lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.