Corona virus : पुणे विभागात कोरोना बाधितांची संख्या एकूण ८८३ ; मृत्यू ६२

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 12:00 AM2020-04-23T00:00:47+5:302020-04-23T00:00:59+5:30

आजपर्यंत विभागामधील ४५ लाख ८६ हजार ६१२ घरांचे सर्वेक्षण पूर्ण

Corona virus : Number of Corona victims in Pune division is 883, death: 62 | Corona virus : पुणे विभागात कोरोना बाधितांची संख्या एकूण ८८३ ; मृत्यू ६२

Corona virus : पुणे विभागात कोरोना बाधितांची संख्या एकूण ८८३ ; मृत्यू ६२

googlenewsNext
ठळक मुद्देबरे झालेले रूग्ण 143 : 12 रुग्ण गंभीर स्थितीत असून उर्वरीत रूग्णांवर औषधोपचार सुरू

पुणे: विभागातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ८८३ झाली आहे. विभागात १३५ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. त्यांना घरी सोडण्यात आले. अ‍ॅक्टीव रुग्णांची संख्या ७०० आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकूण ६२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 12 रुग्ण गंभीर स्थितीत असून उर्वरीत रूग्णांवर औषधोपचार सुरू आहेत. विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
पुणे शहरासह, पिंपरी चिंचवड व ग्रामीण भागातील मिळून एकूण रुग्णसंख्या ८८३ वर गेली आहे. तर कोरोनामुळे बळी पडलेल्यांची संख्या बुधवारी 59 झाली आहे.  जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे महापालिका हद्दीत 772, पिंपरी चिंचवड मध्ये 59, नगरपरिषद व कॅन्टोन्मेंट हद्दीत 27 व जिल्हा परिषदेच्या हद्दीत 25 जण असे एकूण 883 रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. तर आतापर्यंत 143 कोरोनाबधित रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत.
आजपर्यत विभागामध्ये एकुण १० हजार ७१७  नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी १० हजार २१०  नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यापैकी ९ हजार २६४ नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून ८८३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
आजपर्यंत विभागामधील ४५ लाख ८६ हजार ६१२ घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. त्यात १ कोटी ७६ लाख ३६ हजार ६७३ जणांची तपासणी केली आहे. त्यापैकी ८६५ जणांना अधिक तपासणीसाठी सुचित करण्यात आले आहे.


पुणे जिल्हा - ८१३ बाधित, मृत्यू -५५,

सातारा-१६ बाधित,  मृत्यू-२,

सोलापूर- ३० बाधित, मृत्यू-३,

सांगली- २७ बाधित,१ मृत्यू,

कोल्हापूर- १० बाधित, मृत्यू ०

Web Title: Corona virus : Number of Corona victims in Pune division is 883, death: 62

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.