Corona virus : पुणे शहरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ४३ ने वाढला; दिवसभरात तीन रुग्णांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2020 09:24 PM2020-04-18T21:24:40+5:302020-04-18T21:28:40+5:30

सोमवार ते शनिवार या गेल्या आठवड्याची आकडेवारी पाहिली तर दरदिवसाला सरासरी ५० रुग्ण वाढत आहेत.

Corona virus : The number of coronû patient in Pune city increased by fourty three | Corona virus : पुणे शहरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ४३ ने वाढला; दिवसभरात तीन रुग्णांचा मृत्यू

Corona virus : पुणे शहरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ४३ ने वाढला; दिवसभरात तीन रुग्णांचा मृत्यू

Next
ठळक मुद्देएकूण आठ रुग्ण अत्यवस्थ तर चार रुग्णांना सोडले घरी मृत्यू दर १४ टक्क्यांवरून आला १० टक्क्यांवर

पुणे : पुणे शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा शनिवारी ४३ ने वाढला असून शहरातील कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या ५४४ वर पोहचली आहे. दिवसभरात एकूण तीन रुग्णांचा मृत्यू झाला असून कोरोनामधून पूर्णपणे बरे झालेल्या चार रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेले आठ रुग्ण मात्र अत्यवस्थ आहेत. 
महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी सहापर्यंत शहरात नव्याने ४३ रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांपैकी ससून रूग्णालयात ०९, नायडू हॉस्पिटलमध्ये १७, रूबी हॉलमध्ये ०८, सह्याद्री रुग्णालय कर्वे रोड येथे १, केईएममध्ये ०२, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात ०४ तर नोबल हॉस्पिटलमध्ये ०२ रुग्ण दाखल आहेत. शहरातील उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ०८ जणांची प्रकृती चिंताजनक असून यापैकी ससून रूग्णालयात ४ व खाजगी रुग्णालयातील चार जणांचा समावेश आहे.
शहरात मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ५३ झाली असून यामध्ये ससूनमधील एका आणि खासगी रुग्णालयातील दोघांचा समावेश आहे. हे तिघेही विविध आजारांनी ग्रस्त होते. एकूण चार रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले असून बरे झालेल्यांची एकूण संख्या ३७ झाली आहे.
----------
पालिकेने घरोघर सर्वेक्षण सुरू केलेले आहे. त्यासाठी ७७९ पथके नेमण्यात आली आहेत. आतापर्यंत १० लाख ०३ हजार २२१ घरापर्यंत पालिकेची ही पथके पोचली असून ३३ लाख ४० हजार २६९ लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. 
------------
मृत्यू दर १४ टक्क्यांवरून आला १० टक्क्यांवर
सोमवार ते शनिवार या गेल्या आठवड्याची आकडेवारी पाहिली तर दरदिवसाला सरासरी ५० रुग्ण वाढत आहेत. काही दिवसांपूर्वी रुग्ण संख्या कमी होती आणि मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक होते. गेल्या आठवड्यात हा मृत्युदर जवळपास १४ टक्के होता. या आठवड्यात रुग्ण संख्या वाढली असली तरी मृत्यूचे प्रमाण कमी होऊन १० टक्क्यांवर आले आहे. दर दिवसाला सरासरी तीन रुग्णांचा मृत्यू होत आहे.
----------
आठवड्यातील संक्रमित रुग्ण व मृत्यूंचा आकडा

तारीख          नवे रुग्ण       मृत्यू
१३ एप्रिल        ३३             ०२
१४ एप्रिल       ४४              ०४
१५ एप्रिल       ५५              ०४
१६ एप्रिल       ६५              ०५
१७ एप्रिल       ५९             ०३
१८ एप्रिल       ४३              ०३ 
एकूण            २९९            २१

Web Title: Corona virus : The number of coronû patient in Pune city increased by fourty three

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.