Corona virus : पुणे शहरात एकाच दिवसात वाढले सर्वाधिक २०२ रुग्ण; दिवसभरात ११ रुग्णांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 09:38 PM2020-05-16T21:38:04+5:302020-05-16T21:41:02+5:30

रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेले एकूण १४९ रुग्ण अत्यवस्थ

Corona virus : The number of patients increased by 202 in a single day | Corona virus : पुणे शहरात एकाच दिवसात वाढले सर्वाधिक २०२ रुग्ण; दिवसभरात ११ रुग्णांचा मृत्यू

Corona virus : पुणे शहरात एकाच दिवसात वाढले सर्वाधिक २०२ रुग्ण; दिवसभरात ११ रुग्णांचा मृत्यू

Next
ठळक मुद्दे एकूण रूग्णांची एकूण संख्या झाली ३ हजार २९५ बरे झालेले ६८ रुग्ण घरी, तर एकूण एक्टिव्ह रुग्ण १४१२ आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १ हजार ६९८

पुणे : शहरातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा एकाच दिवसात २०२ ने वाढला असून ही आजवरची सर्वाधिक वाढ आहे. दिवसभरात बरे झालेल्या ६८ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण ११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरात एकूण रूग्णांची एकूण संख्या ३ हजार २९५ झाली असून प्रत्यक्षात अ‍ॅक्टिव्ह रुग्ण १ हजार ४१२ आहेत. रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेले एकूण १४९ रुग्ण अत्यवस्थ असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. 
शनिवारी रात्री नऊपर्यंत शहरात नव्याने नोंद करण्यात आलेल्या २०२ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ससून रूग्णालयात ०७, नायडूसह पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये ९६ तर खासगी रुग्णालयांमध्ये ९९ रुग्ण दाखल झाले आहेत. शहरातील उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी १४९ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ४१ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून १०८ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. 
शहरात शनिवारी ११ मृतांची नोंद करण्यात आली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १८५ झाली आहे. दिवसभरात एकूण ६८ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. यामध्ये नायडू रुग्णालयातील ५७ रुग्ण, ससूनमधील ०२ तर  खासगी रुग्णालयांमधील ०९ रुग्णांचा समावेश आहे. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १ हजार ६९८ झाली आहे. तर एक्टिव्ह रूग्णांची संख्या १ हजार ४१२ झाली आहे.
-------------
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण १२०५ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ३० हजार २२४ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे. एकूण एक्टिव्ह रूग्णांपैकी पालिकेच्या दवाखान्यांमध्ये ८९९, ससून रुग्णालयात १०९ आणि खासगी रुग्णालयांमध्ये ४०४ रुग्ण उपचार घेत आहेत.

Web Title: Corona virus : The number of patients increased by 202 in a single day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.