Corona virus : पुणे शहरात कोरोनातून ठणठणीत बरे झालेल्यांची संख्या ८ हजारांच्या पुढे ,बुधवारी ५०१ रुग्णांची वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 12:04 PM2020-06-25T12:04:09+5:302020-06-25T12:07:09+5:30
विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्यांपैकी २७७ जण अत्यवस्थ
पुणे : शहरात एकूण रुग्णांपैकी ८ हजार १०० रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत. बुधवारी दिवसभरात ५०१ रूग्णांची भर पडली. कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा १३ हजार ६५४ झाला आहे. दिवसभरात बरे झालेल्या २७३ जणांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील २७७ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण १७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात ऍक्टिव्ह रुग्ण ५ हजार ९ असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
बुधवारी रात्री नऊपर्यंत शहरात नव्याने नोंद करण्यात आलेल्या ५०१ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ससून रूग्णालयात १५, नायडूसह पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये २३६ तर खासगी रुग्णालयांमध्ये २५० रुग्ण दाखल झाले आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी २७७ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ५६ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून २२१ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत.
शहरात बुधवारी १७ मृतांची नोंद करण्यात आली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ५४५ झाली आहे. दिवसभरात एकूण १५५ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. यामध्ये पालिकेच्या रुग्णालयांतील ९६ रुग्ण, ससूनमधील ०५ तर खासगी रुग्णालयांमधील ५४ रुग्णांचा समावेश आहे. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ८ हजार १०० झाली आहे. तर एक्टिव्ह रूग्णांची संख्या ५ हजार ९ झाली आहे.
-------------
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ३ हजार ४१६ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ९७ हजार २२४ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.