Corona virus : पुणे जिल्ह्यातील कोरोना संशयित रूग्णांच्या तपासण्याचे प्रमाण पन्नास टक्क्यांनी घटले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2020 12:44 PM2020-05-05T12:44:45+5:302020-05-05T12:45:23+5:30
तपासण्याच घटल्याने पॉझिटिव्ह रूग्णांची नेमकी कळेना..
पुणे : पुणे जिल्ह्यात सोमवारी (दि. 4) रोजी एकाच दिवसांत 71 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या वाढली आहे. तर 4 कोरोना बाधित व्यक्तींचा कोरोना मृत्यू झाला. गेल्या आठवड्यात दिवसाला 750 ते 800 पर्यंत एका दिवसांत कोरोना संशयित रूग्ण तपासणी करण्यात येत होती. परंतु यामध्ये सोमवारी रूग्णांची तपासणी तब्बल पन्नास टक्क्यांनी घटली आहे. सोमवारी संपूर्ण जिल्ह्यात केवळ 337 संशयित रूग्णांची तपासणी करण्यात आली. यामुळे सध्या जिल्ह्यात दररोज वाढणाऱ्या रूग्णांची संख्या कमी झाल्याचे दिसत आहे.
जिल्ह्यातील सोमवार पासून लॉकडाऊनमध्ये मोठी सुट देण्यात आली आहे. परंतु रूग्णांचे प्रमाण मात्र कमी होताना दिसत नाही. जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची खरी संख्या लक्षात येण्यासाठी जास्तीत जास्त रूग्णांची तपासणी करण्याचे आदेश केंद्रीय पथकाने दिले आहेत. मागील आठवड्यात दररोज 750 ते 800 संशयित रूग्णांची तपासणी केली जात होती. परंतु गेल्या दोन दिवसांपासून ही तपासणी थेट निम्यानी कमी झाली आहे. सोमवारी जिल्ह्यात 71 नवीन रूग्ण वाढ झाली तर 4 व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यु झाला.यामुळे जिल्ह्यात आता पर्यंत कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 2 हजार 122 वर जाऊन पोहचली आहे. तर एकूण मृत्यु 115 झाले आहेत. तर आता पर्यंत 553 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
-----
एकूण बाधित रूग्ण : 2122
पुणे शहर : 1876
पिंपरी चिंचवड : 125
कॅन्टोनमेन्ट व ग्रामीण : 121
मृत्यु : 115
घरी सोडलेले : 553