Corona virus : अबब! पुणे शहरात गुरुवारी १६३ नवीन रुग्ण; जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३४२६ वर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 11:01 PM2020-05-14T23:01:24+5:302020-05-14T23:01:49+5:30
रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेले एकूण ११६ रुग्ण अत्यवस्थ
पुणे : शहरातील कोरोनाग्रस्त रूग्णांमध्ये तब्बल १६३ रूग्णांची भर पडली असून १०९ रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. शहरात रूग्णांची एकूण संख्या २ हजार ९८७ झाली असून प्रत्यक्षात अॅक्टिव्ह रुग्ण १३३२ आहेत. दिवसभरात एकूण सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेले एकूण ११६ रुग्ण अत्यवस्थ असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
गुरुवारी रात्री साडेआठपर्यंत शहरात नव्याने नोंद करण्यात आलेल्या १६३ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ससून रूग्णालयात ०७, नायडू रुग्णालयात १३४ तर खासगी रुग्णालयांमध्ये २२ रुग्ण दाखल झाले आहेत. शहरातील उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी १०९ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ३४ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून ८२ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत.
शहरात गुरुवारी सहा मृतांची नोंद करण्यात आली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १६९ झाली आहे. दिवसभरात एकूण १०९ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. यामध्ये नायडू रुग्णालयातील ५८ रुग्ण, ससूनमधील ०४ तर खासगी रुग्णालयांमधील ४७ रुग्णांचा समावेश आहे. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १४८६ झाली आहे. तर एक्टिव्ह रूग्णांची संख्या १ हजार ३३२ झाली आहे.
-------------
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण १४१४ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत २७ हजार ३४९ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे. एकूण एक्टिव्ह रूग्णांपैकी पालिकेच्या दवाखान्यांमध्ये ९५३, ससून रुग्णालयात ११० आणि खासगी रुग्णालयांमध्ये २६९ रुग्ण उपचार घेत आहेत.
......................................
जिल्ह्यात एका दिवसांत आत्तापर्यंतची उच्चांकी म्हणजे १९४ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची वाढ
जिल्ह्यात गुरुवारी (दि.१४) एका दिवसांत आता पर्यंतची उच्चांकी म्हणजे १९४ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची वाढ झाली. तर ६ रूग्णांचा मृत्यू झाला. यामुळे आता पर्यंत जिल्ह्यात १८१ कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात ६७ दिवसापूर्वी पहिला कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण सापडला. त्या दिवसापासून कोरोना बाधित रूग्णांचा वाढत आलेख सुरूच आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध पातळीवर अनेक प्रयत्न सुरू आहेत. यामुळे काही प्रमाणात नियंत्रण मिळविण्यात यश आले असले तरी तपासण्याचे प्रमाण वाढविण्यात आल्याने कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या देखील वाढताना दिसत आहे. या १९४ पॉझिटिव्ह रूग्णांमध्ये सर्वाधिक रूग्ण वाढ पुणे शहरामध्ये असून, त्यानंतर कॅन्टोनमेन्टचा नंबर लागतो. यामुळे भविष्यात पुणे शहरावर अधिक लक्ष केंद्रीत करावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
------
एकूण बाधित रूग्ण : ३४२६
पुणे शहर :२९८५
पिंपरी चिंचवड : १८०
कॅन्टोनमेन्ट व ग्रामीण : ३०१
मृत्यु : १८१