Corona virus : अबब..! पुणे विभागात एका दिवसांत 415 नवीन रुग्णांची वाढ; 15 जणांचा बळी 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 07:36 PM2020-05-22T19:36:40+5:302020-05-22T19:41:48+5:30

बरे होणाऱ्यांपेक्षा नवीन वाढीचा वेग दुपट्ट 

Corona virus : Ohh ..! 415 new patients in one day in Pune division; 15 died | Corona virus : अबब..! पुणे विभागात एका दिवसांत 415 नवीन रुग्णांची वाढ; 15 जणांचा बळी 

Corona virus : अबब..! पुणे विभागात एका दिवसांत 415 नवीन रुग्णांची वाढ; 15 जणांचा बळी 

Next
ठळक मुद्देविभागात एका दिवसांत 415 नवीन रुग्ण , तर 232 बरे झाले अखेर विभागात अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या 2 हजार 807 एवढीआजपर्यत विभागामध्ये एकुण 65 हजार 551 नमूने तपासणीसाठी प्राप्त अहवालांपैकी 50 हजार 314 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह

पुणे विभागात शुक्रवार (दि.22) रोजी एका दिवसांत तब्बल 415 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची वाढ झाली. तर 15 कोरोना बाधित रूग्णांचा मृत्यू झाला.यामुळे विभागातील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांनी 6 हजारांचा पट्टा पार केला आहे. दरम्यान शुक्रवारी 415 नवीन रुग्णांची भर पडली तर 232 रुग्ण बरे होऊन घरी गेले. आत्तापर्यंत 2 हजार 927 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण बरे झाले आहेत . यामुळे आज अखेर विभागात अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या 2 हजार 807 एवढी आहे. विभागात कोरोनाबाधित एकुण 295 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 197 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

पुणे विभागात कालच्या बाधित रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये पुणे जिल्ह्यात297, सातारा जिल्ह्यात 20, सोलापूर जिल्ह्यात 46, सांगली जिल्ह्यात 3, कोल्हापूर जिल्ह्यात 49 अशी वाढ झालेली आहे.
यापैकी पुणे जिल्हयातील 5 हजार 14 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 2 हजार 552 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.अ‍ॅक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 212 आहे. कोरोनाबाधित एकूण 250 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 190 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. सातारा जिल्हयातील 201 कोरोना बाधीत रुग्ण असून 106 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ?क्टीव रुग्ण संख्या 90 आहे. कोरोनाबाधित एकूण 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 
सोलापूर जिल्हयातील 524 कोरोना बाधीत रुग्ण असून 218 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ?क्टीव रुग्ण संख्या 269 आहे. कोरोना बाधित एकूण 37 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हयातील 62 कोरोना बाधीत रुग्ण असून 38 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अ‍ॅक्टीव रुग्ण संख्या 23 आहे. कोरोना बाधित एकूण 1 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्हयातील 228 कोरोना बाधीत रुग्ण असून 13 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अ‍ॅक्टीव रुग्ण संख्या 213 आहे. कोरोना बाधित एकूण 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 65 हजार 551 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 56 हजार 445 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 9 हजार 149 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 50 हजार 314 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 6 हजार 29 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

 

Web Title: Corona virus : Ohh ..! 415 new patients in one day in Pune division; 15 died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.