Corona Virus : अबब! पुणे शहरात शनिवारी १९६८ नवीन कोरोनाबाधित; ४६ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2020 12:47 AM2020-08-30T00:47:55+5:302020-08-30T00:48:17+5:30

शनिवारी दिवसभरात १६२७ रुग्ण झाले ठणठणीत बरे..

Corona Virus: Ohh! New corona in Pune city on Saturday 1968; 46 died | Corona Virus : अबब! पुणे शहरात शनिवारी १९६८ नवीन कोरोनाबाधित; ४६ जणांचा मृत्यू

Corona Virus : अबब! पुणे शहरात शनिवारी १९६८ नवीन कोरोनाबाधित; ४६ जणांचा मृत्यू

Next
ठळक मुद्देप्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या झाली १५ हजार ४२३

पुणे : शहरातील कोरोना झालेल्या रुग्णांची संख्या ९२ हजार ८३९ झाली असून शनिवारी दिवसभरात १९६८ रूग्णांची वाढ झाली. तर, दिवसभरात १६२७ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ८३४ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ४६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या १५ हजार ४२३ झाली आहे. 

उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ८३४ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ५०६ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून ३२८ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. तर, २ हजार ९०१ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत.

दिवसभरात ४६ मृतांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये पुण्याबाहेरील १५ रूग्णांचा समावेश आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या २ हजार २३२ झाली आहे. दिवसभरात एकूण १ हजार ६२७ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ७५ हजार १८४ झाली आहे. तर एक्टिव्ह रूग्णांची संख्या १५ हजार ४२३ झाली आहे.

-------------

दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ७ हजार ४७ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ४ लाख ४० हजार ४६ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.

Web Title: Corona Virus: Ohh! New corona in Pune city on Saturday 1968; 46 died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.