Corona Virus : बापरे! पुणे जिल्ह्यात बुधवारी दुपारपर्यंतच कोरोनाबाधितांची संख्या पोहचली ५ हजारांवर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 01:19 PM2021-03-17T13:19:49+5:302021-03-17T21:09:40+5:30
पुणेकरांनो सावध व्हा..!
पुणे : पुणे जिल्ह्यात बुधवारी ( दि. १७) दुपारपर्यंतच कोरोना रुग्णांची संख्या ५ हजारांच्या पुढे गेली आहे. आणि एकूण पॉझिटिव्हिटी रेट देखील २५ टक्क्यांच्या आसपास गेला आहे. इतक्या प्रमाणातील वाढ हे काळजीचे कारण बनले आहे.
पुणे शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये सलग वाढ सुरुच असून सक्रिय रुग्णांचा आकडाही वाढला आहे. त्यातच बुधवार आजवरची सर्वाधिक रुग्णवाढ नोंदविली गेली. बुद्धवारी दिवसभरात २ हजार ५८७ रूग्णांची वाढ झाली. तर, बरे झालेल्या ७६९ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ४२५ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या १५ हजार ३२ झाली आहे.
उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ४२५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर, ८०५ रुग्ण आॅक्सिजनवर आहेत. दिवसभरात ११ मृतांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ४ हजार ९८० झाली आहे. पुण्याबाहेरील ५ मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दिवसभरात एकूण ७६९ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या २ लाख ३ हजार ७८५ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या २ लाख २३ हजार ७९७ झाली आहे. सक्रिय रूग्णांची संख्या १५ हजार ३२ झाली आहे.
-------------
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण११ हजार २३० नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत १२ लाख ७४ हजार ९२६ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.