Corona virus : पुणे शहरात शुक्रवारी पुन्हा १०४ कोरोनाबाधित रूग्णांची वाढ : चार जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 09:40 PM2020-04-24T21:40:30+5:302020-04-24T21:44:51+5:30
कोरोनाबाधितांची संख्या वाढत असतानाच कोरोनामुक्त होण्याची संख्याही नित्याने वाढत आहे.
पुणे : पुणे शहरात सलग दुसºया दिवशी कोरोनाबाधितांची संख्या शंभरीने वाढली असून आज पुन्हा १०४ नवे कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे. गेल्या दोन दिवसात हा शंभरानेच वाढत असून, आज शहरातील एकूण रूग्ण संख्या ९८० झाली आहे. तर आज नव्याने चार जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान आज आणखी १६ जण कोरोनामुक्त होऊन घरी गेले परतले.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी सातपर्यंत १०४ नवीन कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता शहरातील हॉस्पिटलही आता कमी पडू लागल्याने, बालेवाडी येथील क्वारंटाईन सेंटरला आता आयसोलेशन सेंटरमध्ये रूपांतरित करण्यात आले आहे.. या ठिकाणी दाखल असलेल्या संशयितांपैकी २५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, येथील रूग्णांसह पालिकेच्या नायडू हॉस्पिटल व अन्य हॉस्पिटलमध्ये ७१ रूग्ण आहेत. तर खाजगी हॉस्पिटलमध्ये १२ तर ससून रूग्णालयामध्ये २१ रूग्ण उपचार घेत आहेत.
पुणे शहरातील कोरोनामुळे बळी गेलेल्यांची संख्या ६४ झाली आहे. आज मृत्यू पावलेल्या चार रूग्णांमध्ये कॅम्प परिसरातील ३२ वर्षीय शिक्षिकेचा समावेश आहे. या महिलेला गुरूवारी केईएम रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. त्यावेळी ती मृतावस्थेतच होती़ त्यामुळे तीची वैद्यकीय चाचणी केली असता तिला कोरोनाची लागण झाल्याचे आज आढळून आले. याचबरोबर ससूनमधील पर्वती दर्शन येथे राहणाºया ६१ वर्षीय महिलेचा रात्री उशिरा मृत्य झाला़ तर शिक्रापूर येथील रहिवाशी असलेल्या ४० वर्षीय पुरूषाचाही आज मृत्यू झाला़ तसेच मंगेशकर हॉस्पिटलमधील ५२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.
कोरोनाबाधितांची संख्या वाढत असतानाच कोरोनामुक्त होण्याची संख्याही नित्याने वाढत आहे. आज नव्याने १६ रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. यामुळे पुणे शहरातील कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांची संख्या १४६ झाली आहे. सद्यस्थितीला ७७० कोरोनाबाधित रूग्ण उपचार घेत असून, यापैकी ४१ जणांची प्रकृती गंभीर आहे.यामध्ये ससून हॉस्पिटलमधील २९ जणांचा समावेश असून, ४ जण व्हेटिलेटरवर आहेत.