Corona virus : राजगुरुनगर परिसरात खासगी दवाखाने बंद ; कोरोनाच्या भीतीमुळे डॉक्टरांचा पोबारा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 06:57 PM2020-03-27T18:57:07+5:302020-03-27T18:57:34+5:30
रूग्णसेवा ही ईश्वरसेवा मानणारे डॉक्टर मात्र कोरोनाची लागण होऊ नये या भीतीने दवाखाने ठेवत आहे बंद
राजगुरुनगर: कोरोनाच्या दहशतीने राजगुरुनगर व परिसरातील खासगी दवाखाने बंद असल्याचे स्पष्ट चित्र आहे. राजगुरुनगर व परिसरातील खासगी क्लिनिक व काही हॉस्पिटल यांनी रूग्णसेवा देण्याऐवजी या संकटांला घाबरून पोबारा केला आहे.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी खासगी दवाखाने सुरू ठेवावेत, नागरिकांची गैरसोय होऊ देऊ नका असे आवाहन वारंवार करूनही रूग्णसेवा ही ईश्वरसेवा मानणारे डॉक्टर मात्र कोरोनाची लागण होऊ नये या भीतीने दवाखाने बंद ठेवत आहे. विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैेसेकर यांनी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात खासगी दवाखाने बंद ठेवणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करण्यासंबंधीचे आदेश पुणे विभागातील जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोनाबाधित रूग्णांची वाढ होण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला पुणे व पिंपरी चिंचवड शहरामध्ये रूग्णसंख्या जास्त होती. अनेक संशयित रुग्णांना विलगीकरण कक्षामध्ये ठेवले गेले.राज्य शासनाने तातडीने पावले उचलत करोनाचा प्रसार वाढू नये म्हणुन शाळा,महाविद्यालये, थिएटर, मॉल्स, खाजगी क्लासेस, आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चौदा एप्रिलपर्यंत देशभरात अत्यावश्यक सेवा वगळून पूर्ण लॉकडाऊन घोषित केले. राजगुरुनगर व परिसरातील खासगी क्लिनिक व काही हॉस्पिटल यांनी रूग्णसेवा देण्याऐवजी या संकटांला घाबरून पोबारा केला आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी खाजगी दवाखाने सुरू ठेवावेत, नागरिकांची गैरसोय होऊ देऊ नका असे आवाहन करूनही रूग्णसेवा ही ईश्वरसेवा मानणारे डॉक्टर मात्र कोरोनाची लागण होऊ नये या भितीने दवाखाने बंद ठेवत आहे .
मधुमेह, रक्तदाब, ह्रदयविकार यासारखे गंभीर आजार असलेले व थंडी, ताप,सर्दी, खोकला आजार असलेल्या रूग्णांची अवस्था रामभरोसे आहे. साधा फ्ल्यू म्हणजेच कोरोना असु शकतो या शक्यतेने लोकांबरोबर डॉक्टरसी गर्भगळीत झाले आहे.
राजगुरुनगर व परिसरात किराणा, दुध, मेडिकल, पिठाची गिरणी, भाजी विक्रेते,शेतकरी हे कोणतीही पर्वा न करता सेवा पुरवित आहे. पोलीस, महसुल, नगरपालिका, ग्रामपंचायत प्रशासन व पदाधिकारी अहोरात्र कर्तव्य बजावत असताना खासगी दवाखाने बंद असल्याने शस्त्रक्रिया तर दूर उपचार मिळणेही दुरापास्त झाले आहे.
कोरोना संसर्गजन्य असल्याने संपकार्तून प्रसार होण्याची भीती आहे, परंतु डॉक्टरांनी सर्व प्रकारची दक्षता घेऊन नागरिकांना सुविधा दिल्या पाहिजेत अन्यथा कोरोनाच्या संकटामुळे इतर आजारांकडे दुर्लक्ष होऊन दुर्दैवाने त्यातून काही रूग्णांना मृत्यूलाच सामोरे जाण्याची दाट शक्यता आहे. जिल्हा व तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी याबाबत खासगी दवाखाने सेवा पुरविण्यात असमर्थ ठरत असतील तर त्याबाबत तातडीने कार्यवाही करून किंवा खाजगी दवाखाने अधिग्रहीत करून शासनाच्या माध्यमातून चालवावे व लोकांना दिलासा द्यावा अशी मागणी जोर धरत आहे.