Corona virus Pune : पुणे शहरात सोमवारी १२८ नवे कोरोनाबाधित : १७१ जणांची कोरोनावर मात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 08:07 PM2021-08-30T20:07:30+5:302021-08-30T20:08:58+5:30
शहरातील सक्रिय रूग्ण संख्या २ हजार २३४ इतकी आहे.
पुणे : शहरात सोमवारी १२८ कोरोनाबाधित आढळून आले असून, १७१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज विविध तपासणी केंद्रांवर ६ हजार ८०२ संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी १.८८ टक्के इतकी आढळून आली आहे.
शहरातील सक्रिय रूग्ण संख्या २ हजार २३४ इतकी आहे. आज दिवसभरात १७ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी १२ जण हे पुण्याबाहेरील आहेत़ शहरातील आजचा मृत्यूदर हा १.८० टक्के इतका आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रूग्ण संख्या ही १९८ इतकी असून, ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या २८१ इतकी आहे. शहरात आत्तापर्यंत ३१ लाख २५ हजार ४७१ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ९५ हजार ३४३ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ८४ हजार १८७ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ८ हजार ९२२ जणांचा मृत्यू झाला आहे.