Corona virus Pune : पुणे शहरात मंगळवारी १६८ नवे कोरोनाबाधित : १८८ जणांची कोरोनावर मात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 06:46 PM2021-08-17T18:46:33+5:302021-08-17T18:46:49+5:30
शहरात आत्तापर्यंत ३० लाख १७ हजार ११२ जणांची कोरोना तपासणी
पुणे : शहरात मंगळवारी १६८ कोरोनाबाधित आढळून आले असून, १८८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज विविध तपासणी केंद्रांवर ६ हजार १०१ संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी २.७५ टक्के इतकी आढळून आली आहे.
आज दिवसभरात १५ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी १० जण हे पुण्याबाहेरील आहेत. शहरातील सक्रिय रूग्ण संख्या २ हजार १० असून, शहरातील आजचा मृत्यूदर हा १.८० टक्के इतका आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रूग्ण संख्या ही २०० इतकी असून ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या २७७ इतकी आहे. शहरात आत्तापर्यंत ३० लाख १७ हजार ११२ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ९० हजार ७४२ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ९० हजार ८७४ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ८ हजार ८५८ जणांचा मृत्यू झाला आहे.