Corona virus Pune : पुणे शहरात शुक्रवारी १८५ नवे कोरोना रुग्ण; २३७ जणांना मिळाला डिस्चार्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2021 08:50 PM2021-08-06T20:50:26+5:302021-08-06T20:50:41+5:30
शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ही २ हजार ३९१ असून, आज दिवसभरात ७ जणांचा मृत्यू झाला आह़े.
पुणे : शहरात शुक्रवारी १८५ कोरोनाबाधित आढळून आले असून, २३७ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ आज विविध तपासणी केंद्रांवर ९ हजार ७६६ संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी १.८९ टक्के इतकी आढळून आली आहे.
शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ही २ हजार ३९१ असून, आज दिवसभरात ७ जणांचा मृत्यू झाला आह़े. यापैकी २ जण हे पुण्याबाहेरील आहेत. शहरातील आजचा मृत्यूदर हा १. ८० टक्के इतका आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रूग्ण संख्या ही २०९ इतकी असून ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या ३६० इतकी आहे. शहरात आत्तापर्यंत २९ लाख २७ हजार १०६ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ८८ हजार ४७८ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ७७ हजार २८५ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ८ हजार ८०२ जणांचा मृत्यू झाला आहे.