Corona virus Pune : पुणे शहरात शनिवारी २११ नवे कोरोनाबाधित, तर ३०२ रुग्णांची मात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2021 08:51 PM2021-06-19T20:51:05+5:302021-06-19T20:55:25+5:30

उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ३८७ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

Corona virus Pune : 211 patients were corona infected on Saturday and 302 were cured in pune city | Corona virus Pune : पुणे शहरात शनिवारी २११ नवे कोरोनाबाधित, तर ३०२ रुग्णांची मात

Corona virus Pune : पुणे शहरात शनिवारी २११ नवे कोरोनाबाधित, तर ३०२ रुग्णांची मात

Next

पुणे : शहरात शनिवारी दिवसभरात २११ रुग्ण आढळून आले. तर, दिवसभरात ३०२ रूग्ण बरे झाले आहेत. विविध रुग्णालयातील ३८७ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सक्रिय रुग्णसंख्या घटली असून हा आकडा २ हजार ५५९ झाला आहे.  

उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ३८७ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. ५८५ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. दिवसभरात ८ मृतांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ८ हजार ५२४ झाली आहे. पुण्याबाहेरील ९ मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दिवसभरात एकूण ३०२ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ४ लाख ६४ हजार ५०५ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या ४ लाख ७५ हजार ५८८ झाली आहे. सक्रिय रूग्णांची संख्या २ हजार ५५९ झाली आहे.  
-------------   
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ५ हजार ७२४ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत २६ लाख १० हजार ४१२ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.

Web Title: Corona virus Pune : 211 patients were corona infected on Saturday and 302 were cured in pune city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.