Corona virus Pune : पुणे शहरात मंगळवारी २१६ कोरोनाबाधित तर ३०४ जणांची कोरोनावर मात 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 10:12 PM2021-07-27T22:12:19+5:302021-07-27T22:12:30+5:30

शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ही २ हजार ५४८ असून, आज दिवसभरात ११ जणांचा मृत्यू

Corona virus Pune : 216 people were affected and 304 people were recovered from corona on Tuesday In Pune | Corona virus Pune : पुणे शहरात मंगळवारी २१६ कोरोनाबाधित तर ३०४ जणांची कोरोनावर मात 

Corona virus Pune : पुणे शहरात मंगळवारी २१६ कोरोनाबाधित तर ३०४ जणांची कोरोनावर मात 

googlenewsNext

पुणे : शहरात मंगळवारी २१६ कोरोनाबाधित आढळून आले असून, ३०४ जण कोरोनामुक्त झाले आहेत़  आज विविध तपासणी केंद्रांवर ५ हजार ८८४ संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ३़६७ टक्के इतकी आढळून आली आहे़ 

शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ही २ हजार ५४८ असून, आज दिवसभरात ११ जणांचा मृत्यू झाला आह़े़  यापैकी ५ जण हे पुण्याबाहेरील आहेत. शहरातील आजचा मृत्यूदर हा १. ७९ टक्के इतका आहे. 

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रूग्ण संख्या ही २२२ इतकी असून ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या ३२८ इतकी आहे. शहरात आत्तापर्यंत २८ लाख ५० हजार १६४ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ८६ हजार ७८१ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ७४ हजार ७८१ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ८ हजार ७४२ जणांचा मृत्यू झाला आहे.

स्पर्धा परीक्षांना जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्राधान्याने लसीकरण 
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेकरिता पुण्याहून दिल्लीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्राधान्याने लसीकरण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. याकरिता आज (बुधवार दि़ २८) मंगळवार पेठेतील कमला नेहरू रुग्णालयात सकाळी १० ते ५ या वेळेत लसीकरण केले जाणार आहे. 

युपीएससीने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार युपीएससीची पूर्व परीक्षा १० ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्यामुळे पुण्यातील विद्यार्थी दिल्लीला जाणार असल्याने त्यांची तेथे कोणतीही अडचण निर्माण होऊ नये. यासाठी महापालिकेने कमला नेहरू रुग्णालयात बुधवारी सकाळी १०.०० ते सांयकाळी ०५.०० या वेळेत लसीकरण मोहीम घेतली असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.
दरम्यान, आज केवळ कोव्हॅक्सिन लस उपलब्ध असून, सहा दवाखान्यांमध्ये हे लसीकरण होणार आहे. शासनाकडून आज कोव्हिशिल्ड लसीचा पुरवठा न झाल्याने, आज महापालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावरील लसीकरण बंद राहणार आहे.

Web Title: Corona virus Pune : 216 people were affected and 304 people were recovered from corona on Tuesday In Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.