Corona virus Pune : पुणे शहरात गुरूवारी २४४ नवे कोरोनाबाधित : १३९ जणांची कोरोनावर मात
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2021 20:07 IST2021-08-05T20:07:21+5:302021-08-05T20:07:36+5:30
शहरात आत्तापर्यंत २९ लाख १७ हजार ३४० जणांची कोरोना तपासणी

Corona virus Pune : पुणे शहरात गुरूवारी २४४ नवे कोरोनाबाधित : १३९ जणांची कोरोनावर मात
पुणे : शहरात गुरूवारी २४४ कोरोनाबाधित आढळून आले असून, १३९ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ आज विविध तपासणी केंद्रांवर ८ हजार ४६९ संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी २.८८ टक्के इतकी आढळून आली आहे. शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ही २ हजार ४४८ असून, आज दिवसभरात ११ जणांचा मृत्यू झाला आह़े़ यापैकी ६ जण हे पुण्याबाहेरील आहेत़ शहरातील आजचा मृत्यूदर हा १़ ८० टक्के इतका आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रूग्ण संख्या ही २०९ इतकी असून ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या ३६१ इतकी आहे. शहरात आत्तापर्यंत २९ लाख १७ हजार ३४० जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ८८ हजार २९३ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ७७ हजार ४८ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ८ हजार ७९७ जणांचा मृत्यू झाला आहे.