Corona Virus Pune : पुणे शहरात बुधवारी २५९ नवे कोरोनाबाधित तर २५६ रुग्णांची कोरोनावर मात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 07:41 PM2021-08-11T19:41:12+5:302021-08-11T19:41:34+5:30
शहरात आत्तापर्यंत २९ लाख ६७ हजार ७९६ जणांची कोरोना तपासणी
पुणे : शहरात बुधवारी २५९ कोरोनाबाधित आढळून आले असून, २५६ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ आज विविध तपासणी केंद्रांवर ९ हजार ९०० संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी २.६१ टक्के इतकी आढळून आली आहे.
दरम्यान, आज दिवसभरात १२ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी ७ जण हे पुण्याबाहेरील आहेत़ शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ही २ हजार ४९ असून, शहरातील आजचा मृत्यूदर हा १. ८० टक्के इतका आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रूग्ण संख्या ही २०४ इतकी असून ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या ३२८ इतकी आहे. शहरात आत्तापर्यंत २९ लाख ६७ हजार ७९६ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ८९ हजार ५०६ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ७८ हजार ६२९ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ८ हजार ८२८ जणांचा मृत्यू झाला आहे.