Corona virus Pune : पुणे शहरात बुधवारी २९५ नवे कोरोना रुग्ण तर ३२१ जणांना मिळाला डिस्चार्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 06:12 PM2021-06-16T18:12:55+5:302021-06-16T18:13:11+5:30

उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ४८३ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. ७०३ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत.

Corona virus Pune: 295 new corona patients and 321 discharged in Pune on Wednesday | Corona virus Pune : पुणे शहरात बुधवारी २९५ नवे कोरोना रुग्ण तर ३२१ जणांना मिळाला डिस्चार्ज

Corona virus Pune : पुणे शहरात बुधवारी २९५ नवे कोरोना रुग्ण तर ३२१ जणांना मिळाला डिस्चार्ज

googlenewsNext

पुणे : शहरात बुधवारी दिवसभरात २९५ रुग्ण आढळून आले. तर, दिवसभरात ३२१ रूग्ण बरे झाले आहेत. विविध रुग्णालयातील ४५१ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सक्रिय रुग्णसंख्या घटली असून हा आकडा २ हजार ७३८ झाला आहे.  
उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ४८३ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. ७०३ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. दिवसभरात ९ मृतांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ८ हजार ५०१ झाली आहे. पुण्याबाहेरील ११ मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दिवसभरात एकूण ३२१ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ४ लाख ६३ हजार ६०१ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या ४ लाख ७४ हजार ८४० झाली आहे. सक्रिय रूग्णांची संख्या २ हजार ७३८ झाली आहे.  
-------------   
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ५ हजार ९५८ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत २५ लाख ९२ हजार ९२० रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.

Web Title: Corona virus Pune: 295 new corona patients and 321 discharged in Pune on Wednesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.