Corona virus Pune : पुणे शहरात शनिवारी ३३१ कोरोनाबाधित, तर ४५९ रुग्ण झाले बरे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2021 07:32 PM2021-06-12T19:32:20+5:302021-06-12T19:33:35+5:30

उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ५१७ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

Corona virus Pune : 331 new corona patients and 459 were cured on Saturday | Corona virus Pune : पुणे शहरात शनिवारी ३३१ कोरोनाबाधित, तर ४५९ रुग्ण झाले बरे

Corona virus Pune : पुणे शहरात शनिवारी ३३१ कोरोनाबाधित, तर ४५९ रुग्ण झाले बरे

googlenewsNext

पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये घट सुरू झाली असून  शनिवारी दिवसभरात ३३१ रुग्ण आढळून आले. तर, दिवसभरात  ४५९ रूग्ण बरे झाले आहेत. विविध रुग्णालयातील ५१७ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सक्रिय रुग्णसंख्या घटली असून हा आकडा ३ हजार १८२ झाला आहे.  

उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ५१७ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. ८६२ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. दिवसभरात १० मृतांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ८ हजार ४६६ झाली आहे. पुण्याबाहेरील १० मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दिवसभरात एकूण ४५९ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ४ लाख ६२ हजार २२२ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या ४ लाख ७३ हजार ८७० झाली आहे. सक्रिय रूग्णांची संख्या ३ हजार १८२ झाली आहे.  
-------------   
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ५ हजार ८२९ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत २५ लाख ७३ हजार २४१ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.

Web Title: Corona virus Pune : 331 new corona patients and 459 were cured on Saturday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.