Corona virus Pune पुण्यातल्या ससून रुग्णालयात कोरोनाने एकाच दिवसात 37 मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2021 10:54 PM2021-04-12T22:54:44+5:302021-04-12T23:00:43+5:30
19 जण दाखल होण्यापूर्वीच मृत. शहरात देखील 54 नवीन मृतांची नोंद
पुण्यातल्या ससुन रुग्णालयात कोरोनामुळे एकाच दिवशी ३७ मृत्यू नोंद झाले आहेत. यातले १९ जण हे ब्रॅाट डेड म्हणजे रुग्णालयात दाखल करण्या पुर्वीच मृत्युमुखी पडले होते तर उर्वरित पेशंट हे ससून मध्ये उपचार घेत होते.
पुण्यातले ससुन रुग्णालय हे कोरोनाच्या साथीमध्ये पेशंटसाठी महत्वाचे रुग्णालय मानले जात आहे. संपुर्ण जिल्ह्यातील गंभीर रुग्ण हे ससुन रुग्णालयात उपचारांसाठी आणले जातात. आज मात्र या रुग्णालयाबाहेर अतिशय विदारक दृश्य पहायला मिळालं. एकीकडे रुग्णालयात बेड मिळावा याच्या प्रतिक्षेत असलेले रुग्ण होते तर दुसरीकडे रुग्णालयाच्या परिसरात मृत पेशंटना घेवुन आलेल्या ऍम्ब्युलन्स च्या रांगा शवागाराबाहेर पहायला मिळत होत्या. ससुन मधील सर्व बेड आधीच पुर्ण भरलेले नवे रुग्ण दाखल होण्याची फारशी शक्यता दिसत नव्हती.
अशा परिस्थिती मध्ये एकुण मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या देखील वाढली आहे. आज एकाच दिवसात ससुन मध्ये तब्बल ३७ मृत्यू नोंदले गेले आहेत. यातले जवळपास १९ लोक हे रुग्णालयात दाखल करण्यापुर्वीच मृत्यूमुखी पडले होते. तर उर्वरित रुग्ण हे ससून मध्येच उपचार घेत असल्याचे रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान जिल्ह्यात देखील ८६ मृत्यू नोंदले गेले आहेत. यातले 53 हे एकट्या पुणे शहरातच नोंदले गेले आहेत.