Corona virus Pune : पुणे शहरात मंगळवारी ३८४ नवे रुग्ण तर ८५८ जण कोरोनामुक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2021 08:07 PM2021-06-01T20:07:54+5:302021-06-01T20:08:09+5:30
पुणे शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ही ५ हजार ५१८ इतकी आहे.
पुणे : पुणे शहरात मंगळवारी ३८४ नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. आज दिवसभरात विविध तपासणी केंद्रांवर ५ हजार ९६४ संशयितांची तपासणी करण्यात आली. तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ही ६.४३ टक्के इतकी आहे.
दरम्यान, दिवसभरात ८५८ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले असून, शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ही ५ हजार ५१८ इतकी आहे. दिवसभरात ३९ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी ११ जण हे पुण्याबाहेरील आहेत. आजचा शहरातील मृत्यूदर हा १.७६ टक्के इतका आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रूग्णालयांमध्ये सध्या १ हजार ४६६ जणांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू असून, शहरातील गंभीर रूग्ण संख्या ही ७८४ इतकी आहे. शहरात आत्तापर्यंत २५ लाख २ हजार ७०१ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ७० हजार ३११ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ५६ हजार ५०९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत शहरात ८ हजार २८४ जणांचा मृत्यू झाला आहे.
-----------